मँगो बर्फी । आंबा बर्फी । आंबा कलाकंद
Mango Kalakand | Mango Barfi
साहित्य:
२ वाट्या दूध, ३-४ चमचे साखर, अर्धी वाटी मँगो पल्प, १-२ चमचे दूध पावडर(optional), दूध मसाला/सुकामेवा (सजावटीसाठी)
कृती:
१. प्रथम कढईमध्ये दूध घ्यावे आणि एक उकळी आल्यावर त्यात मँगो पल्प घालावा. हे मिश्रण एकत्र करून घ्यावे आणि सतत हलवत रहावे.
२. दूध फाटायला सुरुवात होईल. मग त्यातील पाणी पूर्णपणे आटवून घेऊयात.
३. त्यात आवडीनुसार साखर घालू आणि परतून घेऊ. मिश्रण कढइतून सुटायला लागले की त्यात दूध पावडर घालावी आणि २ मिनिटे परतून गँस बंद करावा.
४. एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्यावे त्यावर दूध मसाला घालवा आणि त्याच्या वड्या पाडाव्यात. थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये घेऊन सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपले मँगो कलाकंद तयार!