कैरी पन्ह | Mango Panha

By Snehal's Kitchen Corner Recipe Foods Video 1 Min Read

कैरी पन्ह | Mango Panha

साहित्य:
१ वाटी उकडलेल्या कैरीचा पल्प, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, अर्धा चमचा मीठ, पाणी

कृती:
१. प्रथम कैरीची साल काढून कैरी उडकडून घ्यावी आणि त्याचा गर काढून घ्यावा. गार झाल्यावर त्या मध्ये गूळ, साखर आणि मीठ घालावे.

२. मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे आणि ५ मिनिटे तसेच ठेवावे.

३. नंतर मिक्सर मधून चांगले मिक्स करून घ्यावे. थोडा रंफ बदललेला दिसेल.

४. नंतर ग्लासमध्ये मिश्रण घेऊन त्यात १:५ प्रमाणात गार पाणी घालावे आणि चांगले ढवळून घ्यावे.

अशाप्रकारे आपले कैरी पन्हे तयार!

Please subscribe to the channel for more recipes

Leave a comment