मसाला ताक | Masala Tak

By Snehal's Kitchen Corner Recipe 1 Min Read
मसाला ताक | Masala Tak

मसाला ताक –

साहित्य: एक वाटी दही, ७-८ पुदिना पाने, थोडी कोथिंबीर, मीठ, धनेजिरे पूड, १ छोटा ग्लास पाणी, चाट मसाला (हवा असल्यास)

कृती:

१. प्रथम एका भांड्यात दही, बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबिर एकत्र करून फेटून घ्यावे.

२. नंतर त्यात मीठ, धने जिरे पूड आणि हवा असल्यास थोडा चाट मसाला घालावा.   वरतून पाणी टाकून पुन्हा एकदा नीट फेटून घ्यावे.

३. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे.

अश्याप्रकारे आपले मसाला ताक तयार!

– स्नेहल काळभोर

Leave a comment