मस्तानी तलाव –
मस्तानी तलाव हा पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी (मृत्यू – इ.स. १७४०) हिचे नाव देण्यात आले आहे.तलावाची पाणी साठवण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, त्यात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे.
भौगोलिक स्थान (Location) –
मस्तानी तलाव हा पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे.दिवे घाट चालू होण्याच्या अलीकडे वडकी नावाचे गाव आहे. तिथून ३ किमी अंतरावर आत मध्ये मस्तानी तलाव आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
मस्तानी तलाव म्हणजे पेशवाईतील धरणच. आजूबाजूच्या डोंगरावरून येणारे पाणी या ठिकाणी साचते. बहुदा थोरले बाजीराव पेशवा आणि मस्तानी विरंगुळा म्हणून या जागी येत असे परंतु या गोष्टीला कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मस्तानी तलाव आणि तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर पाशी एखादी वास्तू असावी. कारण येथे खांबाच्या खुणा दिसून येतात.या महालातून तलावाबाहेर असलेल्या विहिरीपर्यंत भुयारी मार्ग असावा कारण त्याचे विहिरीतील तोंड आजही दिसते.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
वडकी हे पुण्यापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण वडकीला जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे ४० मी लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
वडकी परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
वडकी परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
भारत इतिहास संशोधक मंडळात सुमारे २५० वर्षांपू्र्वीच्या नोंदींचा एक कागद सांगतो की ‘मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला’ . यावरून मस्तानी येथे रहात असल्याने या तलावाला मस्तानी हे नाव पडले असे दिसते आहे. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर माधवराव पेशव्यांनी बांधले आहे. मात्र, शिव मंदिराची नोंद उपलब्ध नाही. नोंदीत लिहिलेली बाग आता अस्तित्वात नाही. पुढील काळात बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी तलावात पाणी किती आहे हे पाहण्यास माणसे पाठवल्याचे पत्रही प्रकाशित आहे. बाजीराव पेशव्यांनी तलाव बांधून घेतल्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या काळात या तळ्यासाठी काही रक्कम खर्च झाल्याचे आढळते.
प्रवेश फी (Entry Fee) – Rs – 10
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
पाणी आणि जेवण घेऊन जाणे.
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
मल्हारगड, दिवेघाट आणि सासवड मधील घाट व मंदिरे
संदर्भ – Wikipedia and Facebook