स्त्री वासना शांत करण्यासाठीच असते का?

By Bhampak Entertainment Articles 4 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

स्त्री वासना शांत करण्यासाठीच असते का? किंवा स्त्री हि वासना शमविण्यासाठी असते का?

खरे तर खुप दिवस हा प्रश्न मनात काहूर घालत होता. स्त्री हि वासना शमविण्यासाठी असते का? जो ही पुरुष पहा, तो जो एका महिलेकडे वासनाहीन भावनेने पाहत असतो. स्त्री ने कितीही अंग भरुन कपडे घातली तरी तिचे गुप्तांग न्याहाळत असलेले अनेक पुरुष पाहिलेत. असे का? ज्या संस्कृतीत आपण राहतो वावरतो ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशाची संस्कृती तर असी नाही. भारताची संस्कृती तर असी अजिबात नाही. मग आपल्या डोक्यात हे विचार आले कसे अन कुठुन?

हा चिंतनाचा मुद्दा आहे. त्यातल्या त्यात मराठ्यांच्या इतिहासात डोकावून पहायला गेलो तर स्त्री वर बद्दमल्ल करणारी दोन उदाहरणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६ व्या शतकात इतिहासात नोंद आहेत. एक म्हणजे रांजे गावचा पाटिल, त्याचा शिवाजी महाराजांनी चौरंगा केला. हे आपणा सर्वांना माहित आहे. पण दुसरी घटना सहसा जास्ती लोकांना माहीत नाही. ति म्हणजे रंगो त्रिमळ वाकडे. या रंगो त्रिमळ वाकडे ने एका महिलेवर बदम्मल केला. हि घटना शिवाजी महाराजांना समजताच शिवाजी महाराजांनी रंगो त्रिमळ वाकडे ला कातण्या चढवुन हजर कराय सांगीतले. पण तो वेळीच जावळीच्या मोरेंच्या आश्रयाला गेला. शिवाजी महाराजांनी आपला वकिल पाठवला त्याचा ताबा घेण्यासाठी पण जावळीचा चंद्रराव मोरे याने ताबा देण्यासाठी नकार दिला. तो ताबा देत नाही म्हणून एके दिवशी रात्री रंगो त्रिमळ वाकडे ला कसा मारला कसा मेला हे इतिहासाला हि ठाऊक नाही. त्या नंतर एकही उदाहरण स्वराज्यात सापडले नाही. अस्या महाराष्ट्रात आपण राहतो. अस्या पुण्यवान भूमीत आपण राहतो अन स्त्री च्या बाबतीत आपण भोग वस्तू म्हणून पाहतो? हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन नाही.

जसी आपल्या घरी आई बहीण आहे तसीच दुसर्याच्या घरी ही आई बहीण आहेच की. हे आपण का विसरतो? खरे तर माझे स्वताचेच उदाहरण द्यायचे झाले तर मि सामाजिक कार्यात सदैव वावरतो म्हणून महीलांशी संबंध हा वारंवार येतोच. पण अस्या वेळी आपणास जे लोक पाहत असतात ते लोक आपणास सहज बोलुन जातात. तुझी तर मजा आहे. नावा प्रमाणेच तुझ आहे. तुझ्या आजुबाजुला तर काय गवळणी असतात, मग कुनीकडे ही असो. हे सर्व मला अगदि पाठ झालय. या वेळी माझ एकच उत्तर असत परस्त्री ची इज्जत कराय सिका. पर स्त्री ची आपण जर इज्जत करु तर आपल्या आई, बहीण, बायको, मुलगी यांची इज्जत इतर लोक करतील.

अगोदर स्वता स्त्री ची इज्जत कराय शिका. आणि मला अजुन एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, अरे तुझ्या सोबत महीला मुली मुक्त पणे का अन कस्या बोलतात? यावर माझ अगदि साध व सरळ उत्तर असत. महीलांशी बोलताना आदर पुर्वक बोला. त्यांच्या विचारांना समजुन घ्या. त्यांची इज्जत करा, आदर करा त्या ही तुमची इज्जत करतील आदर करतील. हे येवढ साध समीकरण जर आपणास समजत नसेल तर आपल्या पेक्षा पशु पक्षी प्राणी लाख पटीने बरे. आणि हा जर स्त्री चे व तुमचे मन जुळत असेल तर गोष्ट वेगळी आहे जे काय होईल ते तुमच्या दोघांच्या एक मताने होत असेल तर तो तुमच्या दोघांचा विषय आहे. तरीही आपण महीलांचा आदरच केला पाहिजे यात दुमत नव्हेच.

मी अनेक असे नमुने पाहीले की जे स्वताच्या प्रियसीला, बायकोला घान घान शिवीगाळ करतात मारहाण करतात. हे पुरुषार्थाला धरुन नाही. यात कसला आलाय पुरुषार्थ? जर आपण आपल्या प्रियसीची, बायकोची  इज्जत करु शकत नाही तर आपणास मानुस म्हनवुन घ्यायचा अधिकार नाही. जरी महीलांनी तुम्हाला शिवीगाळ केली तरी आपण तेवढ्याच विनम्रतेने त्यांच्या शी बोलल पाहीजे, का शिवीगाळ केली हे आदर पुर्वक विचारले पाहीजे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. अन ति जोपासने हे आपल कर्तव्य आहे.

लेखण:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे

Leave a comment