मिनी मालपूआ

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read

मिनी मालपूआ

साहित्य:
१ वाटी मैदा, ३ चमचे दूध पावडर, ३ चमचे बारीक रवा, १ चमचा जाड रवा, १ वाटी दूध केशर, १ वाटी साखर, पाणी, तेल

कृती:
१. प्रथम मैदा, दूध पावडर, रवा, दूध एक मिश्रण एकत्र करून घ्यावे आणि अर्धा तास झाकून ठेवावे.

२. तो पर्यंत एका पातेल्यात पाक करण्यासाठी १ वाटी साखर आणि १ वाटी पाणी घ्यावे. उकळी आली की त्यात थोडे केशर घालावे.
(केशर नसल्यास केशरी रंग घालावा पण केशराने चव ही थोडी वेगळी येते). अश्याप्रकारे एक तारी पाक करून घ्यावा.

३. एक कढाईमध्ये तेल घेऊन त्यात आपण तयार केलेले मिश्रण चमच्याने लहान आकारात सोडावे आणि मंद आचेवर तळून घ्यावे.

४. तळून झालेले मालपूआ साखरेच्या पाकात टाकावे आणि २ मिनिटे मुरू द्यावे.

आणि सर्व्हिग प्लेटमध्ये काढून सुकमेव्याने सजवून घ्यावे.

अश्याप्रकारे आपले मिनी मालपूआ तयार!

Leave a comment