मनी हाइस्ट मराठी भाग १ | पहिली मीटिंग

मनी हाइस्ट मराठी भाग १ २ ३ ४ ५ ६ ७

मनी हाइस्ट मराठी भाग १ | पहिली मीटिंग –

गुर्जी – (चश्मा वर करत ) महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून तुम्ही सगळे आलाय पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हि चोरी पूर्ण होई पर्यंत कोणीही एकमेकांना नावाने बोलावणार नाही..मी तुम्हाला एक एक नाव देतो ते वापरायचं…तू उस्मानाबाद..(मनी हाइस्ट मराठी)

उस्मानाबाद – (मावा चावत ) हाड…धाराशिव द्या नायतर राव्हद्या..

गुर्जी – (मान मोडत) हमम..तू तुझ नाव मुंबई.

मुंबई – चलेगा..

गूर्जी – तू सातारा

सातारा – (हॉट मुंबई कडे बघत) जमतंय…पण माझ्यात आण मुंबईत पुणे नका आणू खी खी खी

गुर्जी – तू  अकोला, तू आणि परभणी एकत्र राहायचं…

अकोला – परभणी कोण ???

गुर्जी – आपली टमटम…आणि तू खिडकीपाशी बसलेला तुझ नाव नाशिक, सगळं आल लक्षात कोणाला काही प्रॉब्लेम ? आताच सांगा पुढं मी, आपल्याला काय करायचं ते सांगणार आहे…

नाशिक – संताप नका देऊ राव…सगळ्यांना नाव चांगली दिली आण मलाच का अस…

धाराशिव – गप्रे, काय झालं नाशिक ला, चांगलय की..

नाशिक – काय… टन्ना चांगलय…तो अकोला..ती मुंबई…तो सातारा.. आण ते नाशिक …काय लिंग बिंग हाय का नाय…

गुर्जी – निघा सगळे, संध्याकाळी भेटू.

मनोज शिंगुस्ते

Leave a comment