मनी हाईस्ट भाग ३ (बँकेची निवड)
पुणे – ( दारात लिंबाच्या काडीने दात घासत बसलेल्या धाराशिव ला ) गुर्जी कुठ आहेत ?
धाराशिव – ( काडी एका बाजूला करून ) डब्याला गेलेत ..
पुणे – आ ??
धाराशिव – मोकळं व्हायला गेलेत… तुमी कोण ?
पुणे – मी ? मी कोण ?? नवीन आलास ??
धाराशिव – यक बुक्की घालीन तर ढेंढाळीच लागण…
तितक्यात गुर्जी येतात आणि पाय धूवत..
गुर्जी – हेच आहेत या मिशन चे हेड…यांचं नाव पुणे असेल…
अकोला – हा कामुन हेड…आम्ही काय मिसळी सोबत ब्रेड खातो का ?
नाशिक -(खिडकीच्या ग्रिल वर बसून) म्हणजे मी आता ह्याच ऐकू ?
मुंबई – व्हॉट द हेल… एम आऊट
गुर्जी – जिथं चोरी करायचीए ती बँक पुण्यात आहे, आणि तुमच पुण्याचं ज्ञान पाहता…पूर्ण दिवस वन वे चे फाईन भरण्यातच जाईल म्हणून मी सांगतो तेवढं करायचं… एनी गेसेस कोणती बँक असेल ???
मुंबई – एच.डी.एफ.सी… साऊंड्स कूल…न्युज आयेगी.. शातिर चोरो ने सबसे मेहंगी बँक लुटी…अय्यो किती भारी वाटतंय…
अकोला – रिझव बँक…लै पैशे असणार त्यात…हिकड छापले की हीकड पोत्यात .. गर्मा गरम नोटा….
नाशिक -(शेंबूड ओढत) ॲक्सिस बँक…भारी भारी पोरी आहेत तिथं कामाला…मजा येईल लुटायला…एक तर लै काटा पोरगी होती …सोडली वाटत तीन बँक दिसली नाही परत…मी गेलतो..
धाराशिव -(खुर्चीवर मांडी घालून) केज सहकारी बँक.. लुटू …
गुर्जी -(मिशी खाजवत) यातली एकही नाही…आणि आता फक्त ऐका…आपण पुण्यातली एस.बी.आय वर दरोडा टाकणार आहे आणि पुढच्या मीटिंग ला मी सांगेल काय करायचं आणि कस …
धाराशिव – यस बी आय मधी काय केळ भेटणारे लुटायला…हे गुर्जाड यड झालंय…
गुर्जी – धाराशिव सोडून सगळे निघा. …तू चल माझ्यासोबत आंघोळीला..घे तो मेडीमिक्स साबण..आणि ..
धाराशिव – नाय नाय डन डन… यस बी आय डन..मी आपलं असच म्हणलो…
मनोज शिंगुस्ते