मनी हाईस्ट भाग ४ | महत्वाच्या सूचना

मनी हाइस्ट मराठी भाग १ २ ३ ४ ५ ६ ७

मनी हाईस्ट भाग ४ | महत्वाच्या सूचना –

नाशिक (बाथरूम च्या खिडकी मधून बोंबलत ) – आर पाणी संपलय, डोळ्यात साबण गेलाय…मोटार करा चालू… अयय

मुंबई (मोटर चालू करत करत ) अकोला तुला काय वाटतं किती पैसे येतील आपल्या वाटेला ?

अकोला -(पाणचट तोंड करून) हे गुर्जी मला जरा भपाड च वाटतंय…त्याच्या बापाला हेड केला आस कुड अस्त्य का? आणि बँक बी अशी निवडली जिथं आधीच चोऱ्या झाल्यात…आपल्या हातात काय येणार बंबुरा ???

धाराशिव – पॉइंट ए…

नाशिक – (टॉवेल ने डोकं पुसत) नाश्ट्याला काय केलंय ?

धाराशिव – आय#₹ल्या काय सासरवाडीत राहायला आला का ? आंघुळ झाली ह्याला नाष्टा द्या…तीध कालच्या चपात्या हायेत… चाहात बुडून खा…एक एक भरलेत ह्या गुर्जिन..

अकोला – नाहीत चपात्या…ते पुण सकाळीच तांब्या भर चहा घेऊन बसलेलं..चपातीच्या टोपलीपुढ…

तितक्यात गुरजी येतात…लुंगी एका हातात धरून ब्रश करत…

सगळे इथ या…आणि प्लॅन नीट ऐका…वेळ कमी आहे काम खूप आहेत…सगळ्यात महत्वाची गोष्ट…मी इथूनच तुम्हाला सूचना देईल..मी तुमच्यासोबत नसणार ए…

नाशिक – आय#₹ला मंग तुम्हीच जावा..मिबी इथच बसणार…काय चुत्या वाटलो का मी ? तुम्ही हाना च्या चपात्या आणि आम्ही जातो बांबू गुतून घ्यायला…

धाराशिव – गपे…ते काय म्हणतंय आईक तरी… लागल फन फन करायला …बोला गूरजी..

गुर्जी(हौदात ब्रश पाण्याने धुवत) तुमच्या सगळ्यांच्या फोन वर मी जिओ चे अनलिमिटेड टॉक टाइम मारलेत..एक वेळ चड्डी काढली तरी चालेल पण हेडफोन कानातून नाही काढायचा…मिशन संपेपर्यंत कायम कॉल चालू असणार…

मुंबई – बेस्ट, अँड बॅटरी खतम हुई तो ??

धाराशिव – हा तो काय मग ?

नाशिक – चार्ज कराणा गैभाण्यानो …काय अक्कल पण गेली का गॅस च्या सबसिडी सोबत…

मुंबई – शट अप..

गुर्जी – झालं तुमचं ?? आता ऐका …फोन कट होता कामा नये…नंबर २ …आपण बँकेत दुपारी २ वाजता एन्ट्री करणार आहोत…जेंव्हा अर्धी बँक पूर्ण झोपेत असते…नंबर ३ …आपण बँकेत ATM च्या केबिन मधून प्रवेश करणार..कारण तिथला वाचमन सर्वात सुस्त असतो… ४ गेल्या गेल्या सगळे पंखे बंद करायचे ???

नाशिक – का बरं ???

गुर्जी – ते सांगतो पुढच्या मीटिंग मध्ये…

मनोज शिंगुस्ते

Leave a comment