मनी हाईस्ट भाग ६ | ब्रेक अप के बाद

मनी हाइस्ट मराठी भाग १ २ ३ ४ ५ ६ ७

मनी हाईस्ट भाग ६ | ब्रेक अप के बाद –

मुंबई -( जांभई देत ) अकोलू ए अकोलू किती फ्रेश वाटतय किनई आज…मस्त झोप लागली काल..

अकोला – ( गुडघा खाजवत ) मला कशाला सांगती.. गुर्जीला सांग..

तिकडून धाराशिव बोंबलत…

अय.. मुंबै… गुर्जि बोलावताय… पटक्यान या…अय आवाज इना का ???? अय मुंबाय…

मुंबई – तो का ओरडतोय रे ?? अकोलु…

अकोला – ( फाटक्या सोक्स मधून अंगठा हलवत..) मला काय म्हैती…तुला येगळा आणि मला येगळं वरडला का ??

मुंबई – चल चल…जाऊन देखते है कूछ तो होगा…

धाराशिव – यडी ए कारे तुम्ही…तिकड गूर्जि म्हत्वाच सांगायलय …चला सणसन ..

गुर्जी – ( चष्मा पुसत ) आता जे सांगतोय ते नीट ऐका…बँक उघडेल ९ वाजता…कर्मचारी येतील १०  वाजता.. आपल्याकडेच हाच एक तास आहे आत शिरायला…काही गडबड नाही करायची आरामात आज जायचं…कोणी अडवणार नाही…बाहेर एक शिपाई असेल लांब लचक बंदूक घेऊन…धाराशिव तू त्याला गेल्या गेल्या…तंबाखू मागायची आणि विचारायचं  “सीसीटीव्ही चालू आहे का ??

धाराशिव – ( माणिकचंद गिळून ) आण त्यो समजा…खात नसन तर… मंजे नाही तंबाखू खात नसणं…मावा खात नसणं..तर कस विचारू ???

नाशिक – हेवडाच चांगला ये तर वाच्मिन कशाला झाला ? म्होरच रान नको हाणू सांगणं तेवढं कर…येड्या #₹च

गुर्जी – हमं..तो पर्यंत अकोला तू आत जायचं आणि काउंटरला लावलेला पेन तोडून खिशात घालायचा …जेणेकरून सगळं कामकाज ठप्प होईल…आणि मुंबई तू…तू तिथल्या मॅनेजर कडे एक दोन वेळा बघायचं बस…बाकी सगळं पुढं काय करायचं मी सांगेन …

अकोला – हा पण …चोरायच काय ??? आणि कस ???

गुर्जी – आपण एकही नोट चोरणार नाही…तिथला एक पैसा देखील आपल्याला नकोय…

नाशिक ( धाराशिव कडे पाहून ) काय रताळी चोरायची मग…

गुर्जी – आपण चोरायचा तो लोकांचा विश्वास..त्यांची मर्जी…आपण त्यांच्या मनात हिरो बनायचं…

धाराशिव ( फोन कानाला लावत मोठ्यानं ) हलो दाजी… आओ ते हूनड्यात तुमाला लोकांचा विश्वास आणि मर्जी चालणं का ? पैशे नाय आमच्याकडं हेच आहे .. ( फोन खिशात घालून ) च्यायचा किडा…म्हणल पैशे सुटत्याल तर …

गुर्जी -( तोंड बारीक करून) पैसे येणार खूप येणार फक्त सांगतो तसच करायचं…

नाशिक – गुर्जी हे येड्या भोकाच आहे तुम्ही सांगा पुढं काय करायचं…अय..जा घरी.. उट..

गुर्जी – पुढच्या मीटिंग मध्ये सांगतो…आता मला आणि मुंबईला काही बोलायचंय…तुम्ही निघा…

सगळे मागे फिरतात अकोला डोळ्यात पाणी आणून तसाच एकटक बघत राहतो…

क्रमशः मनी हाईस्ट भाग ६.

मनोज शिंगुस्ते

Leave a comment