मनी हाईस्ट भाग ७ | बँक प्रवेश

मनी हाइस्ट मराठी भाग १ २ ३ ४ ५ ६ ७

मनी हाईस्ट भाग ७ | बँक प्रवेश –

बाहेरच्या डस्टबिन जवळ उभा राहून हाताने हेडफोन चा माईक तोंडाजवळ पकडत हळू आवाजात अकोला…

हलो..मी आलोय…कुणी दिसना इथ…धाराशिव तू कुढे ? मुंबई तू निग्ली का ?

धाराशिव (हेडफोन चा माईक दातात पकडत) भाड्या बडडे ला आला का ह्याला त्याला हुडकायला..गप बस आणि काम कर ..

(खुर्ची वर बंदूक घेऊन बसलेल्या सेक्युरीटी ला)

निवांत बसले पाव्हणं …आज गर्दी दिसाना बँकेत.. तंबाकु आहे का?

सिक्युरिटी – क्या बोले ?

धाराशिव – नाय निवांत बसले म्हणल …आज गर्दी दिसाना बँकेत.. तंबाकु आहे का ?

सिक्युरिटी – हिंदी  हिंदी

धाराशिव – आ त्याहच..भैया ए का तू ? आवघड झालं लगा…

( हळूच बाजूला येऊन फोन वर )

गुर्जी हे वाचमिन भैयकांड ए त्याला मराठी नाय कळत…कस करू ??

नाशिक – पण केळ्या तुला हिंदी येत ना…बोल ना मग..फक्त अंदाज घे त्याची काय सुयरिक नाय करायची..बरोबर ना गुर्जी ?

धाराशिव – हा हा ओव्हर आणि आऊट, ओ चचा मे क्या बोल रहा था..तंबाखू खाते क्या तुम ?? खाते रैते तो बनाव इडा..जवर बाकीचे लोक नई आते..कुचबी बोलो चाचा बँक एक नंबर है यहा का..पण तुम लै काम करते मी जवाबी येतो तुम कायम दिखते..कष्ट करते हुए..

सिक्युरिटी – हा..लेकीन मै तो कल ही आया हू…

धाराशिव – हा.. मंग आपसे पैले जो था वो  …वो तुम सब सेम दिख्ते इस्के वास्ते कन्फ्युज हो गया मे… भोत इमानदार था वो भी..

सिक्युरिटी – नई..भाई वो चोरी करके भागा इस्लिये हमे बुलाया…जाव तुम उधर बैठो.. आयेंगे बँक वाले …

धाराशिव गप जाऊन बसतो तिकडून मुंबई फोनवर…

अरे जेवढं सांगितलं तेवढंच बोल ना..त्याच्या इमानदारी च तुला काय करायचं होत…आता कस कळणार कॅमेरा बंद आहे का चालू ??

गुर्जी – धाराशिव !! त्याला सोड तू आत जा आणि कॅश काउंटरला नंबर ला थांब..

धाराशिव – का बरं ?

नाशिक – आरे सांगणं तेवढं कर ना… पुलढ रान कायला हाणतो…बरोबर ना गुरजि ???

अकोला – गुर्जी फॅनची बटण घावणा ?? मी दोन तीन बटण बंद केली तर लायटी बंद झाल्या…एक बाय माझ्या कड रागण बगाय लागली…काय उमजाना ??

नाशिक – येड्या..एक काम कर…वाच्मीन पशि जाऊन थंडी वाजल्याची ॲक्टिंग कर…त्याला म्हण फ्यान बंद कर… करण बरोबर ते… व्हय गा नाय गुर्जी ???

गुर्जी – हम..आता लहान मोठ्या गोष्टी मला नका विचारू…स्वतःच डोकं वापरा…आणि महत्वाचं आता कोणालाही शंका येईल…तेंव्हा बँकेत सगळे येई पर्यंत शांत बसा…पुढच्या सूचना मी नंतर देईल..

क्रमशः मनी हाईस्ट भाग ७ | बँक प्रवेश

मनोज शिंगुस्ते

Leave a comment