मूग डोसा

By Snehal's Kitchen Corner Recipe Foods 1 Min Read
mug dosa

मूग डोसा

साहित्य:
मूग डोसा: ३ वाटी हिरवे मूग, १ वाटी तांदूळ, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना- आवडत असल्यास, पाणी गरजेनुसार

लाल चटणी: १ टोमॅटो, १ कांदा, 1 चमचा लाल तिखट, १ चमचा हरभरा डाळ, १ चमचा उदीड डाळ, मीठ, २ चमचे तेल

कृती:
१. हिरवे मूग आणि तांदूळ साधारण ८ ते १० तास भिजवून ठेवावेत. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. जसे लागेल तसे पाणी घालावे. वाटत असताना त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना टाकावा. वरतून चवीनुसार मीठ घालावे.

२. या मिश्रणाचे डोसे करावेत.

चटणीसाठी:
१. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात हरभरा डाळ आणि उडीद डाळ परतून घ्यावी. एक बेडगी मिरची टाकावी आणि कांदा-टोमॅटो चिरून टाकावे. हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. आणि बाउल मध्ये काढून घ्यावे.

अशाप्रकारे आपले मूग डोसे आणि लाल चटणी तयार!

-Snehal Kalbhor

1 Comment