मुगाचा शिरा –
साहित्य:
१ वाटी मुगाची डाळ, १ वाटी साजूक तूप, १ वाटी साखर, ३ वाटी दूध, केशर, काजू आणि बदाम
कृती:
१. प्रथम मुगाची डाळ ३-४ तास पाण्यात भिजून घ्यावी आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
२. एका पॅनमध्ये २ चमचे साजूक तूप घेऊन त्यात काजू बदाम खरपूस भाजून घ्यावेत आणि वाटीत काढून घ्यावेत.
३. पॅनमध्ये थोडे तूप घेऊन त्यात मुगाची वाटलेली डाळ परतून घ्यावी. १० मिनिटांनी गॅस बंद करून हे मिश्रण गार करून घ्यावे आणि मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करावे.
४. पॅनमध्ये तूप घेऊन त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण परत १५ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावे.
५. थोडा लालसर रंग आल्यावर त्यात हळू हळू दूध घालावे आणि साखर घालून मिश्रण घट्ट होऊ द्यावे. वरतून काजू बदाम टाकावे आणि पुन्हा थोडे तूप सोडावे.
६. सर्व्हिंग बाउलमध्ये गरमागरम सर्व्ह करावे. अशाप्रकारे आपला मुगाचा शिरा तयार!
©Snehal Kalbhor
https://www.instagram.com/s_n_e_h_a_l_k?r=nametag