नाचणी चिक्की

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read

नाचणी चिक्की

साहित्य:

नाचणी पीठ, गूळ, सुकामेवा, साजूक तूप

कृती:

१. प्रथम एक कढईत 2 चमचे साजूक तूपामध्ये १ वाटी नाचणी पीठ भाजूण घ्यावे.

२. भाजलेले पीठ गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढावे.

३. कढई मध्ये २ चमचे साजूक तूप टाकून त्यात पाऊण वाटी गूळ वितळेपर्यंत गरम करून घ्यावा. नंतर २ मिनिटे तसाच मंद आचेवर ठेवावा.

४. नंतर गूळ आणि भाजलेले नाचणीचे पीठ एकत्र करून घ्यावे. २ मिनिटे परतून घ्यावे.

५. एक प्लेटला साजूक तूप लावून त्यात हे मिश्रण काढून पसरवून घ्यावे. वरतून सुकामेवा लावून त्याच्या वड्या पडून घ्याव्यात.

अशाप्रकारे नाचणी चिक्की वडी तयार!

Leave a comment