नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण

By Bhampak Places Articles 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

नेकलेस पॉईंट आणि भाटघर धरण –

भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉईंट. पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते. नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात. डावीकडे रस्ता भोर शहरा कडे जातो तर उजवीकडील रस्ता निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर धरण जवळील परिसराकडे.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठावर मोरगांव हे ठिकाण आहे. पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे. पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

भोरकडे निघाल्यावर वाटेत डावीकडे एक अप्रतिम निसर्गदृश्य बघण्यासाठी थांबायचे आहे. इथे नीरा नदी खूप सुंदर असे वळण घेऊन वाहते. हे वळण  नेकलेस सारखे दिसते. सुरेख अशा या वळणाचे दर्शन काही अंतर खाली उतरून घेता येते. ऐन पावसाळ्यात तर सर्वत्र हिरवागार गालीचा पसरलेला आणि त्यातून हे बाकदार वळण घेत वाहणारी नीरा फारच सुंदर दिसते.

भोरच्या अलीकडे २-३ किलोमीटरच्या अंतरावर येळवंडी नदीवर १५० फुट उंचीचा ‘भाटघर धरण’ येणाऱ्या जाणार्या प्रवाशांना एक प्रसन्न अनुभूती देतो आणि त्यामुळेच तिथे फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही.भारतात ब्रिटिश काळात बांधलेले भाटघर धरण अतिशय महत्त्वाचे धरण आहे.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

भोर हे पुण्यापासून सुमारे ५० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण भोरला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

भारतात ब्रिटिश काळात बांधलेले भाटघर धरण अतिशय महत्त्वाचे धरण आहे.

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
Leave a comment