उत्पत्ती वैगन आर ची..
खुप वर्षांपूर्वी मारुती कंपनीत..
इंजिनियर वाग्या – दादया आज पण टकलं आल्या आल्या भडाकल माज्यावर.. ९ च्या शिपला ९.०१ ला आल तर ह्याच्या बापाच काय गेलं..एक मिंटात मारुतीची ऑडी बनावतो का ह्यो भाडखाऊ ??
डिजायनरनर आरडे – (माऊस शर्टला पुसत, तोंड फुगवून मोठा माणिकचंद चावत ) तुला पण झालडा का ? आज बिगाडलाय ते एक शिकुरीटी काल उडून गेला त्याच्यावर..म्हणून
इंजिनियर वाग्या – का ?
डिजायनरनर आरडे- ते सुझुकी मदी गेलत वाटत इंटरव्हीव ला, ह्याला कळल. हे झालं सुरू आल्या आल्या, विषय वाल्डा त्यानी धरली ह्याची गचांडी. अजून एक वाच्मन आला त्याणी मागून ढुंगणावर लाथ हाणली. टकल बसल खाली.
इंजिनियर वाग्या – बर झाल…. हा पण माजा काय संबंध ? मला का चावल आल्या आल्या. ह्याला मी घोडा लावीत असतो, आरड्या अशी डिजाइन बनव की लोकांनी चपलिनी मारल पायजे ह्याला… लै मोटा प्रोजेक्ट मॅनेजर बनतोय.
डिजायनरनर आरडे – आर जाऊदे ना…कशाला वाढावतो हाकलून दिल ते..
इंजिनियर वाग्या- तू नको टेंशन घ्यु..मी पण काल गेलतो सुझुकीला माझ्याच संग् होत ते शिकुरीटी…झालंय आमचं फायनल..
यच आर कॉल करती म्हणली पेकेज डिस्कशन ला, माज झालं की तुला वडतो…लै पोर भरणार आहे ते…तू बनव डिजाइन ह्यांना गाढाव लाऊनच जाऊ…
डिजायनरनर आरडे – ( एकदम एक्साईट होत, मनी प्लांट च्या कुंडीत ऐवज थुंकत ) कशी करू सांग ?
इंजिनियर वाग्या – कुढुन बी गाडी बगा… भनगारच दिसायला पायजे, मागून उच कर पुढून बुटकी कर…आस वाटायला पायजे… पान टपरी पळायला लागली रोड वर… येड्यावाणी
डिजायनरनर आरडे – डन..आज रात्री आख्ख डीजाइन ओके करून देतो, आस पण कामाला लागल्या पासून एक डिजाइन नाय आवडलं माज ह्यांना..घ्या आता डिजाइन..
( दुसऱ्या दिवशी सकाळी टकलू मॅनेजर च्या केबिन मध्ये )
टकलू – डिजाइन कडे बघत… तुम्ही दोघं जीनियस आहात जिनियस…तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बनवलय ते ?? काल रात्रीच मी सिनियर्सना हे पाठवले…
डिझाइन तर सिलेक्ट झालेच पण चक्क सुझुकी कंपनी सगळं बंद करून या डिझाइन साठी मारुती सोबत मर्ज व्हायला तयार झालीय..
डिजायनरनर आरडे – आण..पण
टकलू – पण बिन काही नाही…मला सकाळीच मालकांचा कॉल आलेला या गाडीला तुम्हा दोघांचं नाव द्या म्हटले..
डिजायनरनर आरडे – मंजे ?
टकलू – अरे वाग्या नाईक च…वैगन आणि आरडे च..आर…अस वैगन आर.. यू गाईज आर सिंपली ब्रिलियंट..तुमच्या मुळे माझं प्रमोशन झालं…३००% हाईक दिली मला.
डिजायनरनर आरडे – आणि आमाला
टकलू – अरे येणारी कित्येक दशकं लोक तुमचं नाव रोड वर पहातील, तुमच्या नावाची गाडी घ्यायची स्वप्न पाहतील पैशात काय आहे…जा जाऊन आनंद साजरा करा… आता दाखवतो त्या सेक्युरीटीला मोठा चालला होता…सुझुकित…घे उद्या पासून सुझुकिच इथ येणार ..
मनोज शिंगुस्ते
(लेखक Wagon R चे गाढे अभ्यासक आणि चाहते)