पाच पांडव मंदिर, तळेगाव दाभाडे

By Bhampak Articles 4 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

पाच पांडव मंदिर, तळेगाव दाभाडे –

पौराणिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या तळेगावात पाच पांडवांचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल उत्सुकता असण्याचं विशेष कारण आहे. संबंध भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचं एकत्र अशी दोनच मंदिरं आहेत म्हणे. एक दिल्लीला आणि एक इथं. भारतातल्या दोनातलं एक मंदिर असेल, तर हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ होऊ शकतं.

भौगोलिक स्थान (Location) –

जुना मुंबई- पुणे महामार्गा लगत तळेगाव दाभाडे आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे. मंदिर छोटे आहे. दरवाज्यातून पाच पांडवांच्या बैठ्या मूर्ती दिसून येतात. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव असे पांडव मूर्ती येथे आहे. आतमध्ये एक छोटा दरवाजा असून, द्रौपदीची निजलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे. वषार्तून दोन वेळा, सहा महिन्याने पूर्वेकडे व पश्चिमेकडे मुख करून विश्रांती घ्यायची अशी ही कथा आहे. हे स्थान पाहण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. या मूर्तींना रंगरंगोटी करून हा ऐतिहासिक वारसा टिकावा म्हणून श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याने मंदिराची रंगरंगोटी व डागडुजी केली आहे.

एका दगडी चौथ्यावर उभे असलेले मंदिर जेव्हा आपण पाहतो तेव्हा मंदिराची उत्सुकता आणखीनच ताणून धरली जाते. मंदिराच्या पाच-सहा पायऱ्या चढून आपण आतमध्ये प्रवेश करायचा. समोरच दिसणाऱ्या पाच पांडवांच्या मुर्ती दिसतात. साधारणत: साडेचार फूट उंचीच्या बैठ्या अवस्थेत असलेल्या पाच पांडवांच्या मुर्ती एकाशेजारी एक अशा एका ओळीत आहेत. डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशा या मुर्ती पहिल्या खोलीत आहे. धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मुर्तींच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते. याच खिडकीतून आपल्याला द्रौपदीचे दर्शन होते. आतील खोलीत एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रौपदी एका कुशीवर नीजलेल्या अवस्थेत दिसून येते.

भारतातल्या दोनातलं एक मंदिर असेल, तर हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ होऊ शकतं. मग व्यवस्था राखणं सोपं जाईल कदाचित. मूर्तींना रंग दिलेले आहेत. त्यामुळं मूळ कलाकृतींवर काही स्थलकालदर्शक किंवा इतर खुणा असतील; तर त्या झाकल्या गेल्या आहेत. जवळच एक शिलालेख आहे.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.तळेगावला येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहे. या दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने तळेगावला आलो की, थेट चावडी चौक गाठायचा.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

पूर्वी द्रौपदीविषयी आख्यायिका अशी सांगितली जायची की, ही दर सहा महिन्यांनी कूस बदलते, पण शेवटी ही आख्यायिकाच! पण अशा आख्यायिकाच या आगळ्या-वेगळ्या मंदिराचे वेगळेपण जपत आहेत. याच नव्हेतर यासारख्या अनेक आख्यायिका येथे ऐकविल्या जातात. त्या म्हणजे पाच पांडव वनवासात असताना तळेगावी आले. तेव्हा द्रौपदी ही दमल्यामुळे तिने काही काळ विश्रांती घेतली ते ठिकाण म्हणजेच हे मंदिर. तर काही जण असेही सांगतात की, खुद्द पांडवांनीच हे मंदिर बांधले.

पौराणिक कथेमध्ये द्रौपदीने दिलेल्या एका शितावर भगवान श्रीकृष्णाचे पोट भरले व त्यामुळे दुर्वास ऋषींचेही काही न खाता पोट भरले असा उल्लेख आहे. ही घटना जेथे घडली ते हे पाच पांडव मंदिर असल्याची आख्यायिका आहे.

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –

बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला

माहिती साभार – Internet.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer

Leave a comment