श्री क्षेत्र पहाडेश्वर, अजमेर सौंदाणे

By Bhampak Places Blogger Maazi Bhatkanti 1 Min Read
पहाडेश्वर मंदिर, अजमेर सौंदाणे

श्री क्षेत्र पहाडेश्वर मंदिर, अजमेर सौंदाणे (बागलाण) –

नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरापासून अजमेर सौंदाणे गाव दहा किलोमीटवर आहे. अजमेर सौंदाणे गावातून एक रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर २ किमी आहे. पहाडेश्वर मंदिर शेजारी अजमेरा किल्ला आहे. पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. याठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे.

पहाडेश्वरहे शिवमंदिर मुळ काळ्या पाषाणाचे असावे. पण आता त्याचे नुतनीकरण केलेले आहे. परिसरात मुळ मंदिराचे दगड पहाण्यास मिळतात. गाभार्‍यात पर्वतांचा देव “पहाडेश्वराची” पिंडी आहे, तर बाहेर सभामंडपात गणपतीची घडीव मुर्ती आहे. या मंदिर परिसरात डाव्या हाताला दत्त मंदिर आहे. इथेच जवळ मोठा पाझरतलाव आहे. श्रावण महिन्यात दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात.

Credit – माझी भटकंती / Maazi Bhatkanti Facebook Page

Leave a comment