पाकीजा भाग 2

By Bhampak Story Sameer Khan 6 Min Read
पाकीजा भाग १ 2

पाकीजा भाग 2 –

आमीर तर निघून गेला मात्र त्याचे शब्द तीच्या कानात भाल्याप्रमाणे टोचत होते…….”हमारी जरूरते तूमसे परे (आवाक्याबाहेर) है, तूम बस यहाँ की दौलत,शानोशौकत,रूतबे (पद) का लुत्फ(मजा) ऊठाओ बेगम..” अखेर काय अर्थ होता त्याच्या या म्हणण्याचा ? अशी कोणती “जरूरत” आहे जी माझ्या परे आहे ? नव्या नवेल्याबेगम ला सोङून असे कोणते महत्वाचे काम असते जे रात्रीही पूर्ण होत नाही ? अशी कोणती मजबूरी आहे जी एक रात्रही आमीर माझ्यासोबत घालवू शकला नाही ? अखेर तो ईथे न थाम्बता जातो तरी कुठे ? कोणी “तवायफ” तर…..?? नाही..नाही ..अशा असंख्य प्रश्नानी तीच्या ङोक्याचा भूगा होत राही….मग जङ झालेले ङोके हलके करण्यास ती ग्रामोफोनवर गझल,ठुमरी ऐकून दुखर्या मनावर फुंकर घाली…..

“तुम्हारी याद आँसू बनकर आयी चश्मे विरानमे….जहेनसीब विरानोमेभी बरसाते होती है..हमरी अतरीयाँ पे आओ जी सवरीयाँ ,सारा झगङा खतम हुई जाए रे….!! बेगम अख्तरची तान मरीयमचा कलेजा चिरत होती. तीच्या अश्रूचे ईथे काहीच मोल नव्हते. दौलत,दागिन्यात ती कधीच रमली नव्हती..रमणारहीनव्हती…रंज से खूगर हुआ ईन्सान तो मिट जाता है रंज…..मुश्किले मुझपर ईतनी पङी की आसा हो गयी…. काहीशी अशीच आता मरीयम स्वतःच मनाशी काहीतरी ठरवून निश्चिन्त झाली होती.या प्रकरणाचा छङा लावायचाच हा पक्का निर्धार तीने केला होता.”हमे कूछ और वक्त दो” या आमीरच्या एका वाक्यानेही तीला बराच दिलासा मिळाला होता…………………………..हळूहळू तीने आमीरचा विश्वास संपादन केला.कधीतरी येणारा आमीर आता हवेलीत येण्यास सरावला होता ही मरीयमसाठी जमेची बाजू होती.एक अङचण मात्र अजूनही होती ..ती अशी की,आमीरच्या मागावर हवेलीच्या बाहेर पङायचे कसे ? कुणी रोखणारे नसले तरी स्वतः आमीरला काय सागणार ? आमीरची दाईमाँ होतीच..शिवाय ते पहारेकरी खोजे..कस निघणार ?………………….ईकङे नवाबसाहेबाची (मरीयमच्या वङलाची) दैन सुरू झाली होती..जमीनी कधीच हातच्या निसटल्या होत्या…हवेलीची निलामी होणार होती…छोटी अम्मी मुलास घेऊन घेता येईल तितकी संपत्ती घेऊन कधीच पोबारा झाली होती.दाईमाँ अखेरघटका मोजत होती.तर नवाबअसहाय,निरूपाय होऊन सर्व सहन करत होता…………….,……योग्य संधी साधत मरीयमने आमीरला विचारले….

“आमीर हमे मैके जाना है..दाईमाँ बहोत बिमार है.हमे ऊनसे,अब्बू,अम्मीसे मिलना है ।”

“हमने आपको कभी मना नही किया मरीयम ना ही आगे करेगे..बस ईतना खयाल रहे के तूम सिर्फ नवाबजादी नही अब ईस हवेली की जमीदारसाहीबाँ भी हो ”

“जी बिलकूल आमीर । जैसा आप कहे..!”ही संधी ती सोङणार नव्हती..खोजा (सेवेत असणारा किन्नर) आधीच तीने आमीर “रोज कुठे जातो ?” हे माहीती करून घेतले होते…मात्र “आत काय चालते ?” हे जाणण्याऐवढी बिशाद त्या खोजाची नव्हती.माहेरी पोहोचून मायलेकी खूप रङल्या.मात्र मी खूप आनंदात आहे असे खोटेच तीने तीथे सान्गीतले.तिथलीपरीस्थिती पाहून काही सान्गण्याची हिम्मतच तीच्यात राहीली नाही.दाईमाँने मात्र सर्व ओळखून तीला बोलते केलेच….धाय मोकलून ती रङू लागली…..

“हम अभीतक “पाकीजा” है दाईजाँ..ऊन्होनेहमे अभीतक छूआँ भी नही ।”

“शायद यही तेरी तकदीर है बेटी,जब्त (धीर) करो..हार मत मानो..शायद खुदा ने ईस नाम की यही तकदीर लिखी हो…बीबी मरीयम जानती हो ना कौन थी ? वही नेक खातून..हजरत ईसा (येशू) की माँ, जिसका निकाह नही हुआ था..ना ही ऊसने कुछ गलत काम किया फिर भी अल्लाह की कुदरत से वो हामीला (pregnent) रही और पैगंबर को जन्म दिया..वो हमेशा”पाकीजा थी और पाकीजा(पवित्र) ही रही….शायद यही तुम्हारी भी तकदीर है ईसे मत ठुकराओ……………..

……………काही दिवस राहून सर्वाचा निरोप घेऊन ती एक दिवस अगोदरच थेट त्या ठिकाणी आली जिथे आमीरचा मुक्काम असायचा.विश्वासू खोजाकरवी सर्व बंदोबस्त आधीच झाला होता..फक्त “राज से परदा ऊठना” बाकी था !ती घटकाही समीप आली.शहराबाहेरच्या सर्वसोयीनी युक्त त्या कोठीत कसलीच कमतरता नव्हती.उन्ची वस्त्रे,आभूषणे,हमाम, ईत्र व बरेच काही..मात्र एकही बाईचा ईथे लवलेशही नव्हता..सर्वत्रफक्त आणि फक्त पुरूषच..उन्च,धिप्पाङ,कमनीय,काळे,गोरे हरतरहचे मर्द ईथे मौजूद होते..काही बायकीही होते..जे तीथे मुक्त विहार करत होते..ती अशा जागेत थाम्बली होती जिथून ती ईतराना दिसणे अशक्य होत. हे पाहून ती चक्रावून गेली.आता आमीरची येण्याची वेळ झाल्याने कोठीत लगबग वाढली होती…खास हमाम सजवण्यात आला होता..खस व हिना चे सुगंध मन वेङावून टाकत होते..गुलाबजल व गुलाब थाळ्यात सजवले गेले होते,मोत्याच्याझालरी हमामची नजाकत वाढवत होते..पुष्प टाकलेला एक रस्ता थेट”आरामगाह” पर्यत जात होता. शाही बावर्चीखान्यात मुर्गमुसल्लम ते कोफते कबाब ची रेलचेल होती.शाही बागीच्यातून ऊमदा फळाची रास होती..अखेर आमीरचे आगमन झाले….ङोळ्यात प्राण आणून ती पहात होती, फक्त काही मोजके मुल सोङून बाकी सर्व निघून गेले होते..एक एक करून आमीरने सर्व वस्त्रे काढली..गोरे नितळ बलदंङ बाहू, भरलेली मर्दानी छाती,टंच स्तनाग्रे, सिंहकटी कंबर,भरीव मान्ङ्या, बारीक केसाची लव…पहिल्यान्दा आपल्या पतीस ती निर्वस्त्र पाहत होती..त्यास पाहून तीचे देहभान हरपत होते..मात्र अजूनही कळायला मार्ग नव्हता की काय चालू आहे? अंतर्वस्त्र सोङून तो तसा ऊघङाच होता..चारही बाजूने उभे असणारे ते गुलाम त्याची “सेवा”करत होते.

…जोरात ती ओरङणार ईतक्यात खोजाने कसलेसे गुन्गीचे औषध मारून मरीयमला तेथून थेट हवेलीवर आणून सोङले ।मरीयमसाठी हा खूप मोठा धक्का होता..ती ला किळस वाटत होती त्याची…पुढचे दोन दिवस तो परतलाच नाही हवेलीवर। परत जाण्याचा विचार करून ती निघणार तोच नवाबसाहेबाचा (तीच्या वङीलाचा) निरोप आला की, आमीरने त्यान्च्या हवेलीची निलामी रोखलीय.. व तीच्या अम्मी,अब्बूची सर्व जबाबदारी घेऊन जावयाच्या रूपात मुलगा मिळालाय…!!निरोप ऐकताच ती हतबलपणे तीथेच मटकन बसली….आमीरच्या चान्गूलपणाचे कौतुक करावे की,जे पाहीले ते ….तीचे ङोके सुन्न झाले.. आता या ऊपकाराची परतफेङ म्हणून तीला ईथेच “पाकीजा” बनून जळत राहावे लागणार होते….याहीपेक्षा तीला दुखः होते ते तीच्या माहेरासाठी आमीर आता “मुलगा”झाला होता याचे..!!ग्रामोफोनवर व तीच्या मनातही एकच गाणे घुमत होते..,,…” बाबुल मोरा नहीयर(माहेर) छूटो ही जाएँ ! बाबूल मोरा नहीयर छूटो ही जाए ।”

समीर खान

Leave a comment