पारले बिस्कीट केक (नो ओव्हन) | Parle Biscuit Cake (No Oven)

By Snehal's Kitchen Corner Recipe Foods 2 Min Read
पारले बिस्कीट केक (नो ओव्हन) | Parle Biscuit Cake (No Oven)

पारले बिस्कीट केक (नो ओव्हन)

Parle Biscuit Cake (No Oven)

साहित्य:
३ पारले बिस्कीट छोटे पुडे, ३ चमचे कोको पावडर, ६ छोटे चमचे पिठीसाखर, चिमूटभर मीठ, साधारण एक वाटी दूध (गरजेनुसार), १ चमचा प्लेन इनो
१ चमचा पाणी

कृती:
१. प्रथम पारले बिस्कीटचा चुरा करून तो मिक्सरमध्ये बारीक पूड होईपर्यंत ब्लेंड करून घ्यावा.

२. तयार पूड चाळणीने चालून घ्यावी म्हणजे जाड तुकडे मिक्स होत नाहीत. तसेच कोको पावडर सुद्धा चालून घ्यावी.

३. तयार मिक्समध्ये मीठ, पिठीसाखर टाकून एकदा नीट मिक्स करून घ्यावे. सर्व मिक्स करून झाले की त्यात हळू हळू दूध मिक्स करावे. आणि एक दिशेने फेटून घ्यावे.

४. तोपर्यंत एकीकडे एक मोठी कढई घेऊन त्यात खाली एक मूठ खडेमिठ टाकून घ्यावे आणि १० मिनिटे झाकण ठेवून तापवून घ्यावे.
तसेच केकपात्राला तुपाने ग्रीसिंग करून घ्यावे किंवा बटर पेपर टाकावा आणि बाजूला ठेवावे.

५. १० मिनिटे तापले की आपल्या केक मिक्समध्ये १ चमचा इनो घालावा त्यावर १ चमचा पाणी घालावे. हे मिश्रण पटकन फेटून लगेच केकच्या ग्रीस केलेल्या भांड्यात टाकावे आणि तापलेल्या कढईमध्ये ठेवावे. वरतून झाकण ठेवून ३० मिनिटे मंद आचेवर बेक होऊ द्यावा. नंतर टूथपीक टाकून एकदा नीट बेक झाला का तपासून घ्यावे.

नंतर केक गार होऊ द्यावा मग एका प्लेटमध्ये काढून घ्यावा.

अश्याप्रकारे आपला पारले बिस्कीट केक तयार!

Leave a comment