पातळ पोह्यांचा चिवडा
साहित्य:
४ वाटी पातळ पोहे, एक मूठभर शेंगदाणे, २ चमचे फुटाना डाळ, ४ हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, १ छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, ३-४ पाकळ्या लसूण, चवीपुरते मीठ, थोडे मनुके/काजू, ३ चमचे तेल
कृती:
१. प्रथम पातळ पोहेचालून घ्यावे आणि कढईत मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. १०-१५ मिनिटे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत.
२. कढईमध्ये तेल घेऊन त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत आणि पोहे काढलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यावेत.
३. नंतर लसूण टाळून घ्यावा थोडा लाल झाला की त्यात फुटाना डाळ, बारीक चिरलेल्या मिरचीचे तुकडे, कडीपत्ता, मनुके टाकून फोडणी करावी. नंतर हळद, हिंग आणि मीठ घालावे.
४. त्यात भाजलेले पोहे आणि आधी तळलेले शेंगदाणे घालावे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
गार झाल्यावर हवी असल्यास थोडी पिठीसाखर घालावी आणि एका प्लेटमध्ये सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार!
-Snehal Kalbhor