फिरनी | Phirni | Firni
साहित्य:
२ चमचे बासमती तांदूळ, २ वाट्या दूध, ३-४ चमचे साखर, दूध मसाला/सुकामेवा, गुलाबपाकळ्या सजावटीसाठी
कृती:
१. प्रथम २ चमचे बासमती तांदूळ २ तास भिजवून घ्यावेत. नंतर ते थोडे जाडसर असे मिक्सरमधून वाटून घ्यावेत.
२. एका कढईमध्ये २ वाट्या दूध घेऊन त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळलेळ्या दुधामध्ये तांदळाची पेस्ट टाकून सतत हलवून घ्यायचा आहे जेणे करून गुठळ्या होणार नाहीत.
३. तांदळाची पेस्ट थोडी शिजायला लागली की त्यामध्ये आवडीनुसार साखर घालावी. साधारण ३-४ चमचे साखर लागते.
४. परत व्यवस्थित हालवून घ्यावे आणि तांदूळ पेस्ट व्यवस्थित शिजली की एका बाउलमध्ये काढून थंड होऊ द्यावी. वरतून दूध मसाला आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून थंडगार सर्व्ह करावी.
अशाप्रकारे आपली फिरनी तयार!