आय.टी कंपनी मध्ये डुक्कर –
स्थळ :- पुणेच..
लेडी एम्प्लॉई – ( डेस्क वर चढून) ओ माय गॉड.. इत्ता बडा पिगी बॅग… हाऊ स्वीट..इट्स मुव्हींग गाईज प्लिज कम..
पुणेरी एम्प्लॉई – (चष्मा नाकावर घेत ) अरे डुक्कर आहे ते आणि आत कस काय आला तो ? ए ए सिक्युरिटी झोपा काढतो काय ? बाहेर हाकल उसको..
लेडी एम्प्लॉई -(खाली उतरून) डुक्कर मतलब ??
PCMC एम्प्लॉई -( डस्तबिन मध्ये विमल थुकत) फ्यानड्री ए ते… की बोर्ड घाल त्याच्या पाठीत..अय हाड…अय हाड हाड
टीम लीडर -(टायपिंग करत करत ) ए वेट… हेल्प डेस्क को टीकेट रेज करो, और कीप मी इन सीसी.. आल्सो दुबे मॅडम … अँड येस इंपॉर्टन्ट मार्क करके भेजणा…
लेडी एम्प्लॉई – सर रेहणे दो ना…कित्ता क्युट लग रा…वो बार्क भी नहीं कर रा..
PCMC एम्प्लॉई – वो खाके आया होंगा…
लेडी एम्प्लॉई – क्या ?
टीम लीडर -( त्याच्याकडे रागाने बघत ) अरे काय नाय… यू गो बॅक टू युर सीट..
पुणेरी एम्प्लॉई -(परत कीबोर्ड आपटत) मला टाइमशीट भरायची आहे, मानसी फ्री आहे तिला सांगा ती पाठवेल मेल हवं तर मी तिच्या मागे बसून तिला मार्गदर्शन करतो..
मॅनेजर -(केबिन मधून बाहेर येत येत ) क्या हुआ ? व्ह्याय एव्हरीबडी इज शाउटींग….??
लेडी एम्प्लॉई- अरे सर क्या हुआ ना, आय वाज वर्किंग वेरी डीलीजंटली मतलब फुल डेडीकेशन से जैसे आपने मीटिंग मैं बताया वैसे ही..
पुणेरी एम्प्लॉई- अरे मुद्दे पे आव ना काय प्रमोशन का मीटिंग है क्या ? मी सांगतो सर मी सकाळ पासून ब्रेक न घेता काम करत होतो, अचानक क्लाएंट चा कॉल आला मी व्यवस्थित त्यांना आपला प्रोजेक्ट एक्सप्लेन करत असताना
PCMC एम्प्लॉई- येडी ये कारे तुम्ही, सर काय इचार्तय तुमचं काय चाललय ते डुकार कुढुन आल ते सांगा…काय विषय झाला शेठ…सॉरी सर…
मी बसलो व्हदो…ही महिला कामगार तिकडून ब्वाम्ब्लद आलो पीगी बॅग पीगी बॅग…मी गेलो पायल तर हे काळकुट्ट डुकार…
मॅनेजर – अरे बापरे …फ्लोर वर..
PCMC एम्प्लॉई – हा ना शेठ..सॉरी सर…मी घेतले ना लगेच ईनीशीएटीव्ह…आण एकट्यानेच दिलं हाकलून…
पुणेरी एम्प्लॉई – अरे ते तिथं डस्टबिन पाशी काय सर आहेत का उभा ? हाकलून दिलं म्हणे ?
PCMC एम्प्लॉई- हा त्याहला…परत आल काय ???
मॅनेजर – व्हॉट डू यू मीन बाय सर उभा आहे का ?
लेडी एम्प्लॉई – सर मीटिंग रूम मे जाके बात करते है, हर बार यही होता है, काम कोई करता है और क्रेडिट कोई और लेके जाता है
टीम लीडर – अरे लेकीन काम हूआ ही नहीं…
PCMC एम्प्लॉई – काम झालं व्हत सर तुमचं लक्ष नव्हतं तुमचं लक्ष फक्त चाटू पोरांकड असतय.
टीम लीडर -( चिडून मेनेजर कडे पाहत ) अरे पण मी इथच आहे, मला कस नाय दिसलं ?
मॅनेजर – (वैतागून) अय रुको सब… मैं भगाता हु आप लोग जाके काम करो..
पुणेरी एम्प्लॉई- (बाह्या मागे सारत) नो सर..प्लिज लेट मी हॅण्डल
लेडी एम्प्लॉई -(केस बांधत ) सर ये मुझे असाईन हूआ था…
PCMC एम्प्लॉई – ( तिथूनच मॉनिटर फेकून डूकराला मारतो, आणि डुक्कर पळून जात आणि सगळा फ्लोअर उठून टाळ्या वाजवतो )
मनोज शिंगुस्ते
लेखक होते कंपनीत काही वर्ष