चुकलेल्या नजरेला…

By Team Bhampak Entertainment Poem 0 Min Read
bhampak post

चुकलेल्या नजरेला तू नवं तेज दे
डोळ्यातल्या पापण्यांना तू नवं स्वप्न दे…
हरवलेल्या वाटेला तू नवी दिशा दे
गोंधळलेल्या आयुष्याला तू नवं वळण दे…
आलेल्या संकटांना तू तोंड दे
जगण्याचा बोध घेऊन तू जगून घे…
तहानलेल्या पाखरांना चोचीपूरत पाणी दे
थरथरणाऱ्या वातेला तू आडोशाचा हात दे…
आत्मविश्वासाला तू खूप सारं बळ दे
शेवटच्या निरोपाला तू तुझा श्वास दे…
– भंपक Aj

Leave a comment