पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी –
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कालखंडात वेगवेगळ्या लेण्या खोदल्या गेल्या आहेत. या लेण्यांपैकी एक सुंदर आणि छोटीशी लेणी हि खोदली गेली ती पुरंदर किल्याच्या जवळ. अगदी समोरील बाजूस असलेली पोखर लेणी फारशी परिचित देखील नाही.(पोखरबेळ, पोखर / पोखर लेणी)
भौगोलिक स्थान (Location) –
सासवडपासून १० कमी अंतरावर असणारे नारायणपूर पुण्यापासून ५५ कि.मी. वर आहे. तेथून पोखर ला जाता येते.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
पोखर लेणी ला जायला पोखर गावातून अगदी पाच मिनिटे लागतात आणि आपण समोर येतो ते एका लेणीच्या पोखरून काढलेल्या गुहेच्या समोर. हि लेणी किती खोल आहेत याचा पहिला आपल्याला अंदाज लागत नाही परंतु ज्यावेळेस आपण या लेणीच्या आतमध्ये शिरतो तेव्हा जे काय दृश्य बघतो ते नक्कीच विस्मयकारक असते. या लेणी मध्ये चक्क ‘सदाशिव’ रूपातील मूर्ती कोरलेली असून आपल्याला घारापुरी लेण्यातील प्रसिद्ध शिल्प ‘सदाशिव’ याची आठवण करून देते. मुख्य लेणीच्या वरच्या बाजूला देखील लेणी खोदायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो परंतु दगड चांगला नसल्याने तेथे लेणे अर्धवट सोडलेले आहे. सध्या तिथे गावकऱ्यांनी शेंदूर लावून देवतांची स्थापना केलेली आपल्याला दिसते.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
नारायणपूर हे पुण्यापासून सुमारे 5० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण मोरगावला जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
परिसरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
साधारण ८ व्या ते ९ व्या शतकात हे लेणे खोदलेले असावे असा अंदाज आहे.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
या लेणी बरोबरच तुम्ही नारायणपूर गावचा नारायणेश्वर आणि एकमुखी दत्ताचे मंदिर पाहू शकता.