रगडा पॅटिस चाट
साहित्य:
२ बटाटे, पिवळा वाटाणा, चिंच-गूळ चटणी, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, सैंधव, हळद, तेल, कांदा, कोथिंबीर, तिखट बुंदी, शेव
कृती:
१. प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. उकडून कुस्करून त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, हळद, थोडंस तिखट घालून त्याचे पॅटिस करून घ्यावेत.
२. तयार पॅटिस तेलावर shallow फ्राय करून घ्यावेत. दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाले की एक प्लेटमध्ये काढावेत.
३. कढईमध्ये थोडं तेल घालून त्यात हळद, थोडं तिखट आणि उकडलेले पिवळे वाटणे घालावेत. नंतर थोडं पाणी आणि चवीपुरते मीठ घालून रगडा उकळून घ्यावा.
४. एका प्लेटमध्ये २ पॅटिस घेऊन त्यावर तयार केलेला रगडा घालावा. वरती चिंच-गुळ चटणी घालावी. चाट मसाला भुरभुरावा. शेव आणि तिखट बुंदीने गार्निश करा.
अशाप्रकारे आपले रगडा पॅटिस चाट तयार!
वेळ: अर्ध्या तास
टीप: वाटाणा एक तास आधी पाण्यात भिजवून ठेवावा मग त्याच्या कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्याव्यात.