राजमा चावल
साहित्य:
राजमा: १ वाटी उकडलेला राजमा, १ टोमॅटो, १ कांदा, लाल तिखट, हळद, आलं, लसूण, कडीपत्ता, जिरे, हिंग, पाणी, तेल, मीठ,
चावल: बासमती तांदळाचा नेहमी प्रमाणे भात शिजवून घ्यावा.
कृती:
१. प्रथम कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कडीपत्ता, मीठ, 1 चमचा लाल तिखट घालून ह्या मिश्रणाची पेस्ट करून घ्यावी.
२. नंतर एक कढईमध्ये तेल गरम करूम घ्यावे. त्यात जिरे, हिंग, कडीपत्ता, हळद घालावी.
३. फोडणी झाल्यावर तयार पेस्ट कढईमध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यावी.
४. पेस्टला थोडे तेल सुटल्यावर त्यामध्ये उकडलेला राजमा घालून घ्यावा आणि २ मिनिट मंद आचेवर परतावे.
५. नंतर त्यात १-२ वाटी पाणी घालून मीठ घालून घ्यावे. उकळी येऊ द्यावी.
६. नंतर गरम वाफाळत्या भातावर राजमा ग्रेव्ही टाकावी. कोशिंबीर आणि एखाद्या चाट सोबत सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपले राजमा चावल तयार!