किल्ले रामदुर्ग –
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग या तालुक्याच्या गावी टेकडीवर किल्ला होता.रामदुर्ग हे गाव मलप्रभा नदीच्या काठावर वसले आहे. कालाच्या ओघात फक्त त्याचे प्रवेशद्वार, एक बुरूज, तुरळक तटबंदी असे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यात आता शाळा, प्रशासकीय इमारती उभ्या आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा किल्ले रामदुर्ग.
किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला असे म्हणले जाते पण तशी ऐतिहासिक नोंद नाही. इ.स. १६७४ मध्ये महाराजांनी अप्पाजी सुरी हबळीकर यांची नेमणूक केली. महाराजांच्या मृत्यूनंतर रामदुर्ग आणि नारगुंद मुघलांच्या ताब्यात गेला.पुढे इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर रामराव भावेंनी रामदुर्ग जिंकून घेतले व परिसरावर आपला वचक बसविला. पुढे करवीरकर छत्रपतींकडून रामदुर्गचा ताबा सातारकर छत्रपतींकडे गेला. पेशवाईच्या काळात अनेक तंटे होवून भावेंच्या वंशजात ह्याचे अधिकार वाटले गेले. इंग्रजांच्या काळात हे संस्थान होते ते स्वातंत्र्यानंतर भारतात सामील झाले.
टीम – पुढची मोहीम