नाते | Relationship

bhampak-banner

Relationship –

आपले संबंध अनेकांसी असतात, पण नाते फक्त दोघात असते, नाती आणि नातेवाईक अनेक असतात , पण प्रत्येक नाते हे फक्त दोघांचेच असते आणि ते जपण्याची जबाबदारी दोघांचीही असते. कोणतेही नाते हे प्रेमाने बांधलेले असते आणि त्यागावर स्थीर असते. व्यवहारीक नाती ही गरजेपूरती जपली जातात, हे खरेतर नातेच नसते, तो फक्त व्यवहार असतो आणि तो फायद्यासाठीच केला जातो , तोटा दिसला की हे दोघांनाही नको असते .Relationship.

आपले कोणतेही नाते टिकवायचे असेल तर त्याग आणि प्रेम या दोनच गोष्टींची गरज असते, या दोन्ही गोष्टी अंतःकरणातील स्वार्थ आणि वासना संपल्याशिवाय हृदयात निर्माणच होत नाहीत आणि जेथे स्वार्थ आणि वासना नसते, तेथे व्यवहार, फायदा, तोटा, त्रास याला स्थान रहात नाही .

कोणत्याही नात्यात तिसरा घुसला की नात्यात बिघाड होतो , कारण तिसऱ्याला महत्त्व आले की पहिल्या, दुसऱ्याकडे दुर्लक्ष होते, ते जाणवले की नाते टिकवता येत नाही. आपले कोणतेही नाते या तिसऱ्यानेच तोडलेले आहे, मग हा तिसरा स्वार्थ, व्यवहार, अपेक्षा, व्यक्ती, परतफेड, बोज, गरज यापैकी कोणीही असू शकतो .म्हणून कोणतेही नाते टिकवायचे असेल तर तिसरा त्यात घुसूच नये यासाठी कायम दक्ष रहा. प्रत्येक खरे नाते हे सुख आणि आधार देणारेच असते, त्यामुळे जीवनात त्याची अन्न, पाण्या इतकी गरज असते. सगळी नाती तुटली तरी माणूस जगू शकतो , पण एक नाते असे आहे की ते तुटले तर जगणेच अर्थहीन होऊन जाते , ते कधीच तुटू देऊ नका, ते नाते म्हणजे भगवंत आणि आपण यातले नाते, ते नाते आहे देव आणि भक्त किमान यात तरी तिसरा घुसू देऊ नका.

हे नाते तुटले तर आपले वागणे बिघडते आणि जगण्यातून वागणे वजा झाले तर जगणे उरतच नाही , म्हणून हे नाते मरेपर्यंत टिकवणे गरजेचे आहे.

डॉ .आसबे ल.म.

Leave a comment