सरसेनापती उमाबाई व खंडेराव दाभाडे समाधी

By Bhampak Places 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

सरसेनापती उमाबाई व खंडेराव दाभाडे समाधी, तळेगाव दाभाडे –

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला मूर्त रूप देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या आणि लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही वीर लढाऊ एकमेव दाम्पत्य म्हणून नोंद झालेल्या श्रीमंत सरदार सरसेनापती खंडेराव आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा इतिहास सर्वश्रुत आहे.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने बांधलेली बनेश्वर मंदिराशेजारची समाधी ही उत्कृष्ट शिल्पाकृतीचा नमुना आहे. अशा प्रकारची ही एकमेव समाधी म्हणावी लागेल. समाधीच्या चौथऱ्यावर चोहोबाजूंनी रामायण व महाभारत शिल्परूपात कोरलेले आहे. अद्वितीय व एकमेव असे हे शिल्प असून, इतरही अनेक वैशिष्ट्ये या समाधीच्या बांधकामात आढळतात.

पार्थपुत्र अभिमन्यूने भेदलेल्या चक्रव्यूहाचे, भारतात एकमेव असे शिल्प याच समाधीवर कोरलेले आहे. मराठ्यांची राजधानी शिवतीर्थ रायगडाच्या राजसदरेवरील मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेल्या चार पायांत, तोंडात आणि शेपटीत सहा (हत्तीरूपी) शाह्या जखडून ठेवणाऱ्या सिंहाचे साधर्म्य असलेले शिल्पदेखील कोरलेले आहे.

बनेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारासमोर चिंचेच्या झाडाखाली सरसेनापती उमाबाई यांचे समाधीस्थळ आहे. समाधीच्या आजूबाजूला कोरीव काम केलेले शिल्पाकृती चार-पाच छोटे दगडी खांब विखुरलेले दिसतात. दाभाडेंचा तळेगावातील व् वाडा पूर्णपणे कोसळला असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बुरूज, तटबंदी, भिंती पूर्णपणे ढासळल्या आहेत.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

 

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –

बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला

माहिती साभार – इंटरनेट.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer

Leave a comment