दुसरे महायुद्ध | Second World War

By Bhampak Articles 9 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

दुसरे महायुद्ध –

इ.स.दि. ०३ सप्टेंबर १९३९ ,  जुन्या जगाचा शेवटचा दिवस…

बिनबेगच्या घड्याळात रात्री बाराचे ठोके पडले. आणि कँलेंडरचे एक पान फडफडले.  रविवार दि. ०३ सप्टेंबर १९३९ या दिवसाला सुरुवात झाली होती. सारे लंडंन शहर शांत झोपी गेले होते. फक्त ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ या इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून प्रकाश बाहेर डोकावत होता. पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांच्या मंत्रीमंडळाची तातडीची बैठक.सुरू होऊन अर्धा तास तास झाला होता. चव्वेचाळीस तासांपुर्वी नाझी जर्मनीच्या फौजा पोलंडच्या सिमा ओलांडून वॉर्साच्या रोखाने सैराट धावत सुटल्या होत्या. असाहाय्य पोलंड इंग्लंड आणि फ्रान्स कडे मोठ्या आशेने पाहत होते. आणखी बारा तासांनी *हाऊस ऑफ कॉमन्स* ची बैठक सुरू होणार होती. त्या बैठकीत काय निर्णय घ्यायचा याची चर्चा करण्यासाठीच ही तातडीची बैठक बोलवण्यात आली होती.  चेंबरलेन यांना जाणीव होती की आता आपण कोणता निर्णय घेतो यावर आपलेच नाही तर *कॉंझेर्व्हेटिव्ह* पक्षाचेही भवितव्य अवलंबून आहे. हिटलरला शांत करण्याचे चेंबरलेन यांचे अनेक प्रयत्न फसले होते  , त्यामुळे आता संपूर्ण लंडंन शहर एकाच गोष्टीची मागणी करत होते ती म्हणजे युद्ध.दुसरे महायुद्ध.

सगळे लंडंन म्हणत होते  *बस्स झाला हा शांततेचा नकली खेळ. आता आपले राष्ट्र वाचवायचे असेल , पोलंडला दिलेला शब्द पाळायचा असेल , आणि युरोप हिटलरच्या टाचांखांली भरडला जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा असेल , तर आता आपण ताठ मानेने उभे राहिले पाहिजे. ब्रिटनने युद्ध पुकारले पाहिजे*  बारा तासांनंतर हाऊस ऑफ कॉमन्सची बैठक सुरू झाली. कॉमन्सची बैठक रविवारी बसण्याचा हा ब्रिटनच्या इतिहासातील चौथा प्रसंग होता. पण या पुर्वीच्या तीन बैठकी आणि आजची बैठक यात फरक होता. पुर्वीच्या तीन बैठकी राजाचे निधन झाल्यामुळे नव्या राजाची घोषणा करण्यासाठी बोलावण्यात आल्या होत्या.  १८२० मध्ये तिसऱ्या जॉर्ज च्या निधनानंतर चौथ्या जॉर्जची द्वाही फिरविण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी कॉमन्सची बैठक भरली होती. त्यानंतर आज ११९ वर्षांनी रविवारी कॉमन्सची बैठक भरली होती. युद्धाची घोषणा करण्यासाठी कॉमन्सची बैठक बोलावण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

वस्तुतः आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा वाजता चेंबरलेन जर्मनीला निर्वाणीचा खलिता धाडतील अशीच सर्वांची अपेक्षा होती. परंतु मध्यंतरीच्या काळात मुसोलिनीने जी नवी शांतता योजना सुचविली होती , ती कितपत व्यवहार्य आहे यासंबंधी ते फ्रेंच नेत्यांशी वाटाघाटी करत होते. महायुद्धाचा भडका उडू नये यासाठी हा शेवटचा प्रयत्न सुरू झाला होता.  रविवारची बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान चेंबरलेन आणि परराष्ट्रमंत्री अर्ल ऑ हँलिफँक्स यांनी साऱ्या परिस्थितीच आढावा घेतला. फ्रान्सनेही आपल्या बरोबर युद्धात उतरलं पाहीजे असे चेंबरलेन यांची इच्छा होती. पण फ्रेंच सेनानींना आणखी अवधी हवा होता. याच गोष्टीबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी पोलंडचे फ्रान्स मधील राजदूत *लुकासिएविझ* फ्रेंच परराष्ट्रमंत्री *बॉनेत* यांच्याशी चिडून बोलत होते. ” चर्चा , चर्चा आणि चर्चा. तुमच्या ह्या चर्चेचा आम्हाला काय उपयोग ? पोलंड फ्रान्स कडून कृतीची अपेक्षा करत आहे आणि तीही वेळ न दवडता. ”  ‘ काल पहाटेपासून नाझी सेना पोलंडच्या सिमेवर धडाका मारत आहे. आणि अजूनही जर्मनीला निर्वाणीचा खलिता धाडावा असे फ्रान्स ला वाटत नाही का ?   मैत्रीच्या कराराला जागण्याची तुमची तयारी आहे की नाही. , हे एकदा आम्हाला समजलेलं बर ‘ बॉनेत यांनी नुसते खांदे उडविले.

शनिवार दि. ०२ सप्टेंबर रोजी परिस्थिती अशी होती की , फ्रान्स आणि पोलंड यांचे ताणले गेलेले संबंध तुटतात की काय अशी शक्यता वाटावी. फ्रान्सला युद्धात सहभाग घ्यायचा आहे की नाही याचाच पोलंडला आता संशय येऊ लागला होता; आणि म्हणूनच फ्रान्सच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठीच लुकासिएविझ परराष्ट्रमंत्र्यांच्या कचेरीत गेले होते. पण फ्रेंच नेत्यांना अजून थोडा अवधी हवा होता. लष्करप्रमुखांना तयारी करण्यासाठी ७२ तासांचा अवधी हवा होता तो त्यांनी १२ तासांनी मागे घेतला होता. अखेर २ सप्टेंबर हा दिवस उजाडला. दिवस भर पँरिसभर सैनिकांच्या बूटांचे आवाज येत होते , बिगुल वाजत होते , गाड्या भरुन खाकी गणवेशातले सैनिक रणांगणाकडे धाव घेत होते.  दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता फ्रान्स ने जर्मनीविरूद्ध युद्धाची घोषणा केली. ह्या सर्व घटना घडत असताना ब्रिटन आणि जर्मनी यांच्यात समझोता घडवून आणण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी शनिवारी रात्री एक स्वीडिश व्यक्ती बर्लिनमधील ब्रिटिश वकीलातीच्या पायऱ्या चढत होती. ‘न्युट्रल डी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या व्यक्तीचे खरे नाव होते , बर्जर डँलरेस.

चव्वेचाळीस वर्षांच्या या श्रीमंत इंजिनिअरला असा विश्वास वाटत होता की , मध्यस्थीच्या कार्यात आपण हमखास यशस्वी होऊ. एक स्वीडिश फर्मचा नोकर म्हणून डँलेरसचे पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात काही काळ जर्मनीमध्ये आणि काही काळ ब्रिटनमध्ये वास्तव्य झाले होते. आणि तेव्हापासून या दोन्ही देशांसोबत त्याचा चांगला संबंध होता. डँलरेसची १९३५ मध्ये फिल्डमार्शल हरमान गोअरिंग याच्याशी ओळख झाली होती. तेव्हापासून नाझी नेत्यांच्या मनात कोणते विचार घोळत आहे याचा त्याला अंदाज येऊ लागला होता.

जर्मनीची काही गाऱ्हाणी रास्त असली तरी नाझी नेत्यांची विचारसरणी खचितच एकांतिक आहे हे डँलेरसला जाणवले. डँलेरसने हेंडरसन यांची भेट घेतली आहे हे कळताच हिटलरने त्याला भेटीसाठी बोलावून घेतले. डँलरेस गोअरिंगबरोबर राईश चँन्सेलरीमध्ये गेला. भेटीच्या प्रारंभी , वरकरणी तरी , हिटलर शांत दिसत होता . परंतु आतल्या आत ज्वालामुखीसारखा भडकून उठला आहे , डँलरेसला काही मिनिटांच्या आत समजून आले. हिटलर खुर्चीवरुन उठला आणि डँलरेस जवळ येऊन उभा राहिला.  तो डँलरेस ला म्हणाला ” शांतता टिकावी म्हणून तु जे करतो आहेस त्यामागची तुझी तळमळ मी समजू शकतो. परंतु , इंग्लंडलाच शांतता नको आहे. स्वतःच्या स्वार्थाखेरीज या इंग्रजांना काही दिसत नाही. तो केवळ बनियांचा देश आहे.”    अकरा वाजता ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारल्याबरोबर या युद्धात कोण विजयी होणार यासंबंधी लंडंनमध्ये अंदाज बांधले जाऊ लागले. हारजितीच्या अंदाजाच्या निमित्ताने  एक नवा जुगारच सुरू झाला. एकाने तर गमतीदार कोडे टाकले होते.

MUSSOLINI

HITLER

CHAMBERLAIN

DALADIER

WHICH

WINS ?

एका चतुर माणसाने या कोड्याचे उत्तर सांगितले.

तो म्हणाला , ” प्रत्येक शब्दातले तिसर अक्षर घेऊन जे नाव तयार होईल ते या युद्धात खऱ्या अर्थान विजयी ठरेल . ”

ते नाव होते ―  STALIN

रात्रीचे नऊ वाजले. अद्याप फ्रान्स आणि ब्रिटन यांनी पश्चिम आघाडी उघडलेली नव्हती. पण गेल्या अठ्ठेचाळीस तासांत वॉर्सा शहराचे स्वरूप पार बदलून गेले होते. रविवारी सकाळी साऱ्या शहरभर उद्ध्वस्त इमारतींचे सांगाडे अस्ताव्यस्त पसरले होते. १ सप्टेंबर रोजी पहाटे ४-४० वाजता हिटलरच्या  फौजांनी पोलंडच्या सीमा ओलांडून वॉर्साच्या रोखाने धडक मारायला प्रारंभ केला. तेव्हापासून गेले दोन दिवस पोलंडसारखे दुबळे राष्ट्र हिटलरच्या झंझावाती आवर घालण्याचा मोठ्या शर्थीने प्रयत्न करत होते.

वॉर्साच्या नागरिकांना गुरुवारची संध्याकाळ आठवत होती.  पोलंड आणि हंगेरी यांच्यातील चुरशीचा फुटबॉल सामना पहाण्यासाठी हजारो नागरिक क्रिडांगणावर लोटले होते. पोलंडने ४ – २ असा हंगेरीचा पराभव करताच वॉर्साच्या आनंदाला सीमा उरली नाही.  गुरुवारची रात्र शांततेत पार पडली.  शुक्रवारी पहाटेपासूनच जर्मन विमानांची घरघर कानावर पडली. साधनसामुग्रीप्रमानेच भूगोलही पोलंडला अनुकूल ठरला. म्युनिक करारानुसार स्लोव्हाकियावर हिटलरचे लष्करी नियंत्रण प्रस्थापित झाले. त्यामुळे पुर्व , उत्तर , दक्षिण या तिनही सीमा उघड्या पडल्या होत्या.  एवढ्यात एका विमानाला कोन्स्टँन्कीन या लहानशा गावावर बॉम्बहल्ला करण्याची लहर आली. वॉर्साच्या दक्षिणेला बारा मैलांवर वित्सुला नदीच्या काठी उभे असलेले हे निसर्ग रमणीय गाव उन्हाळी विश्रामासाठी प्रसिद्ध आहे. लष्करी दृष्टीने या गावास शून्य महत्त्व होते. पोलंडमधील अमेरिकन राजदूत अँन्थनी बिडल आपल्या कुटुंबियांसोबत या गावात विश्रांतीसाठी गेले होते. ते बागेत फिरत असताना त्यांना विमानाची घरघर ऐकू आली. त्यांचा निवासस्थानाजवळच एका विमानाने बॉम्ब फेकला. अमेरिकन राजदूतांचा निवासस्थानाजवळ बॉम्ब पडला ही बातमी वॉर्सा मधील परराष्ट्रीय वार्ताहारांच्या दृष्टीने आघाडीच्या शेकडो सैनिकांच्या मृत्यूपेक्षाही जास्त महत्त्वाची होती. जर्मनीवर पत्रके टाकायला गेलेल्या विमानांंपैकी एक विमान फार लवकरच तळावर परतले. त्या वैमानिकाल एका वरिष्ठाने विचारले ‘ तू इतरांपेक्षा इतक्या लवकर कसा काय परत आलास ?

सर  , मी ते पार्सल खाली ढकलले आणि तात्काळ मागे परतलो.

” म्हणजे तु तो गड्डा न सोडताच खाली ढकलला. ?

होय . म्हणजे मी तो गड्डा सोडून आतली पत्रकं खाली फेकायला हवी होती काय ? वैमानिकाने प्रश्न केला.

” अरे बापरे म्हणजे तुझ्या त्या गठ्ठ्याखाली कोणीतरी खचितच मरण पावलं असणार ?

बरं मग त्यात काय बिघडले. ?

अरे त्या पत्रकांचा तसा उद्देश नव्हता.

वैमानिकाला या बोलण्याचा काहीही बोध झाला नाही. आणि त्याला अधिक समजावून सांगणे वरिष्ठालाही आवश्यक वाटले नाही.

बारा वाजले. पुन्हा कँलेंडर फडफडले. रविवार , ३ सप्टेंबर , १९३९ हा दिवस आपल्या असंख्य आठवणी मागे ठेवून इतिहासजमा झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या रणकंदनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. सर्वार्थाने तो जुन्या जगाचा शेवटचा दिवस ठरला.

हिरोशिमा २१६३ दिवस दूर होते.
संदर्भ – Warsaw te Hiroshima by V S Walimbe

Nishant Kapse 

Leave a comment