शिवाजी महाराजं बनायचं!

By Team Bhampak Articles 6 Min Read
bhampak post

शिवाजी महाराजं बनायचं!

जमिनीच्या सातबाऱ्या वर जरी आपली नाव असली तरी जमिनीचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहे.”त्यांच्या या मातृभूमीचे रक्षण करा.”

मी आपल्यातलाच एक मराठी माणुस,आपल्या प्रमाणेच जीवन जगनारा एक सर्वसामान्य महाराष्ट्रियन नागरिक.पण हे जीवन जगतांना म्हणजेच एक मराठी नागरिक म्हणून जीवन जगतांना या मनात सतत एक विचार येत असतो आणि तो आजही येत आहे.की माझ्या शिवबांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं. काय तर स्वराज्य उभे केले म्हणे, पण कशासाठी? कोणासाठी हिंदूंसाठी,मुस्लिमसाठी की आपली मराठी संस्कृति जपण्यासाठी. आता स्वतःला वरिष्ठ म्हणवून घेणारे नेतेमंडळी स्वतः कितीही भाषण ठोकून ओरडत असली तरी ते फ़क्त पैशांचे भक्त.त्यांना नाही कळणार खरा मराठी बाणा राष्ट्रभक्ती आणि रयत सेवा ! ते फ़क्त सत्तेसाठी लढत होते,लढत आहे आणि लढत राहणार.त्यांच्यात खरच मराठी बाणा असता तर आज आई-बहिनिची अब्रू सहज लुटली गेली नसती.अशीच सहजासहजी भ्रष्टगिरी कोणी केली नसती.पण आता ते सहज शक्य आहे.कारण त्यांचा बाप आज कार्यात नाही आणि याच गोष्टीची खंत आहे मला. हे सर्व जग जाहिर आहे की ‘राजकारण’ एक गटार गंगा,हाही नंगा आणि तोही नंगा..! पण तरी सुद्धा जास्तीत जास्त मराठी युवा पिढी ही राजकारणा कडेच जास्त प्रमाणात वळतांना दिसते,दिसते काय ती वळत आहेतच! याला कारनिभुत कोण? याचे उत्तर तुमच्याकडे असेल तरी मुखातून ते उचारन्याची हिंमत मात्र नसेल.

हीच गत आज माझ्या मराठी माणसाची झालेली आहे,हा मुखातून बरेच वेळा जय शिवाजी! जय भवानी! असा नारा लावतो पण एक गुलाबाच फुल दिसल की कोण भवानी आणि कोण शिवाजी असे मनात पुटपुटतो हा मराठी माणूस असे का? काय कमी पडल, कुठे कमी पडल माझ्या शिवबाच कार्य बोलाना..माझे शिवराय पुरुण उरणारे एक दमदार व्यक्तिमत होते. शिवराय कुठेच कमी पडले नाही.पण आता कमी पडत आहे ते फ़क्त भगवे रक्तच ! विकले गेलेत सर्व ….! पण यांना विकत घेतल कोणी भ्रष्टचाराने, कामाने, लोभाने आणि दृष्ट विचारांनी मनात दृष्ट विचार येण्यामागच कारण एकच आणि ते तुम्हाला ही माहिती आहेच की,ते म्हणजे हे सुरु असलेली गलिच्छ राजनितीच ! होय हीच आताची राजनितीच कारनिभुत आहे या आताच्या सर्व गोष्टीना.

‘राजे पुन्हा जन्माला या’ असे हा मराठी माणूस म्हणतो.नको तिथे हे पवित्र शब्द लिहितो देखिल पण आपण स्वतः शिवरायांसारख जगण्याचा प्रयत्न करू’ असा विचार तो कधी करतच नाही आणि करणार हि नाही असे मला तरी वाटते..’राजा’ बनने फार सोप असेल पण शिवबा बनने तर फारच कठिन! ज्याच्या मनात आल तो नविन नविन शाखा काढतो. पण तुम्ही ज्याच्या नावाने ह्या सर्व शाखा संघटना चालवतात तो तर एकच आहे ना ? की त्यालाही बाटवल? माझे राजे कधीच कोणत्याच पक्ष,सेनेचे किंवा संघटनेत बांधलेले नाही. ते स्वतंत्र आहे समर्थ ! खर तर त्यांना तुमची नाही तुम्हाला त्यांची गरज आहे,त्यांच्या विचारांची गरज आहे.अहो आज तारणाराच मारणारा बनला आहे तर आता आम्ही हाक द्यायची कोणाला?त्या अफजल खानाला? लाज वाटते आज मराठी म्हणून जगण्याची आणि याला करणीभुत हे आताचे बिनबुडाचे राजकारणी मडके आहे.

आज रस्त्याने जात असलेल्या त्या माऊलीला,बहिणीला आणि आईला विचारा ती आजही बिनधास्तपणे कुठेही एकटी वावरू शकते का? आपचुक तिच्या मुखातून नाही हाच शब्द बाहेर येणार आहे हे नक्की. कारण आज सांड मोकाट सुटले आहेत ना? त्यांचा म्होरक्याच दूसरी कड़े नज़र मारतो तर ते तरी काय करणार.पण टाळी एका हटाने वाजत नाही हेही तितकेच खरे आहे.गुलाबाच्या फुलाने देवाच्या चरणावरील स्वताची जागा सोडून डोक्यावर बसण्याची जागा निवडली तर त्याच्या कड़े ज्याला काही कळत नाही तोही बघतो.बघण्याच्याही काही पद्धती असतात कोणी चांगल्या नज़रेने बघतो तर कोणी वाईट नज़रेने आणि काही तर बघण्याच्याही पलिकडे जातात.आपण याला अटकाव नाही करू शकत कारण हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे.

शिवरायांनीही बघितल होत एक गुलाबाच फुल कदाचित ते गुलाबा पेक्षाही सुंदर होत.पण माझ्या राजाचे विचारांचे गुण गाण्यासाठी सागरा इतकी शाई आणि गगना एवढे पानही कमी पडेल.अहो त्या माऊलीला आईचे स्थान दिले.. विचार करा काय विचार असतील माझ्या राजा शिवरायांचे. सुवर्ण अक्षरात कोरली गेली ती ओवी “अशीच असती आमची आई सुंदर आम्ही सुंदर जाहलो असतो” म्हणून तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा…

“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!” हा चित्रपट बघायला बरेच गेले असतील पण शिवाजीराजे भोसले काय बोलत आहे हे ऐकायला आणि समजायला गेले ते फ़क्त बोटावर मोजण्या इतकेच.काही जणांनी खुर्ची गरम केली,काही बघ्यांनी मनात सुराज्य स्थापनेची शपथ घेतली पण चांगले नेतृत्व नाही म्हणून तेहि गप बसले. तर काही AC मधे हवा खाण्यासाठी गेलेत,त्यात अजून एक नवीन मराठी चित्रपटाची भर पडली “स्वराज्य” आता येथे बसलेल्यांना स्वराज्य चित्रपट आला होता कि नाही हेच माहिती नसेल आता हा चित्रपट बघितल्या नंतर मेलेला माणूस नक्की जागा होईल,” स्वराज्य ” अरे त्या चित्रपटात एक संदेश दिलेला आहें आणि तो या “सागर”च्या मनांस भेदून गेला तो संदेश म्हणजे….

” मराठी माणूस हा बुद्धिबळा मधल्या सोंगट्या सारखा असतो. कुणी हत्ती सारखा सरळमार्गी चालतो तर कुणी उंटा सारखा तिरपा नेहमी वाकळ्यात शिरणारा तर कुणी घोड्यासारखा धावत सुटतो पण अडीच घर जाऊन थांबतो,तर कुणी प्यादा सारखा एक एक पाउल टाकतो पुढे पण तेही घाबरत घाबरत.पण मला या पटावरचा वजीर व्हायचं आहे… वजीर ! मिळेल त्या मार्गाने जमेल तसे हवे तसे चाल चालून त्या पटावरील दृष्ट राजाला चिट देऊन गोचीत आणायचा आणि ते मी करणारच!!

अरे मी एकच निश्चय केला आहें रोज रोज घाबरून मरण्यापेक्षा वाघाची चाल चालून एकदा मरेल नाही तर मारेल तरी पण घाबरणार नाही हि या मराठ्याच्या पोराची ” शिवप्रतिज्ञा ” आहें

परत सांगतो, एक लक्षात ठेवा..सातबाऱ्या वर जरी आपली नाव असली तरी जमिनीचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहे.त्यांच्या या मातृभूमीचे रक्षण करा.

“अरे सळसळत राहू दे अंबे या मर्द मराठ्याच रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त”
जगदंब

लेखन- श्री सागर यशवंतराव महाडिक(जळगाव)

Leave a comment