सीताफळ रबडी

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read
सीताफळ रबडी

सीताफळ रबडी

साहित्य:

सीताफळ पल्प, दूध, साखर, सुकामेवा काप

कृती:
१. प्रथम सीताफळाचा पल्प करण्यासाठी सीताफळाचा गर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावा. त्यात ब्लेंडर फिरवावा म्हणजे बिया आणि गर वेगळे होतात. नंतर बिया चमच्याच्या साहाय्याने काढून टाकाव्यात आणि हा तयार पल्प फ्रिजमध्ये ठेऊन द्यावा. (बाजारात तयार सीताफळ पल्प ही मिळतो).

२. एकीकडे पातेल्यात दूध आटवून घ्यावे. दूध खूप आटवण्याची गरज नाही. सीताफळ पल्प घातल्यावर रबडीला घट्टपणा येतो. त्यातच चवीप्रमाणे साखर घालावी.

३. दूध थोडे आटल्यावर पूर्ण गार होण्यासाठी ठेवावे.

४. गार झाल्यावर त्यामध्ये सीताफळ पल्प घालावा. आणि मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यावे. परत थोडा वेळ फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावे.

५. अशाप्रकारे आपली सीताफळ रबडी तयार आहे. एका बाउलमध्ये काढून वरतून सुकामेवा टाकून थंडगार सर्व्ह करावी.

वेळ: एक तास

Leave a comment