सोमेश्वर महादेव मंदिर, पाषाण –
पाषाणचे प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर मंदिर ७०० वर्ष जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार साक्षात जिजाबाई साहेबां हस्ते झालेला आहे. या सोमेश्वर मंदिरामागे, रामनदी काठी एक छानशी पुष्करणी देखील आहे.
मंदिरात बारा ज्योतिर्लिंगातील एक एक मंदिराची प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली आहे, आणि मधोमध शंकर भगवान ची उभी मूर्ती प्रत्यक्ष पाहून मन खरोखर प्रसन्न होते!(सोमेश्वर मंदिर)
भौगोलिक स्थान (Location) –
पुणे शहरातील पाषाण मध्ये सोमेश्वर महादेव मंदिर आहे.शिवाजीनगर पासून अवघ्या ६ किमी अंतरावर हे मंदिर आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
पाषाणचे प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर मंदिर ७०० वर्ष जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार साक्षात जिजाबाई साहेबां हस्ते झालेला आहे. या सोमेश्वर मंदिरामागे, रामनदी काठी एक छानशी पुष्करणी देखील आहे.
मंदिरात मुख्य द्वाराने प्रवेश केल्यावर, आपल्याला, समोर च गणपती चे प्रसन्न दर्शन होते, आणि आजूबाजूला नीट पाहिले तर लगेचच आपल्याला या मंदिराचा भव्य विस्तार जाणवतो, मंदिरा च्या आतमध्ये चांगलीच विस्तृत जागा आहे, भरपूर मोठाली झाडे आहेत, हिरवळ देखील आहे, मंदिराचा मोठा गाभारा आहे, आणि आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला नजीकच्या काळात, बांधून काढलेले बारा ज्योतिर्लिंग असलेली मंदिरांची साधारण पणे १० – १५ फूट लांबी, रुंदी, असलेल्या प्रतिकृती अतिशय सुबक, सुंदर रित्या पक्क्या बांधकामाने उभ्या केलेल्या आहेत आणि हे एक मोठे वैशिष्ट्य च म्हणावे लागेल या मंदिराचे, बारा ज्योतिर्लिंगातील एक एक मंदिराची प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली आहे, आणि मधोमध शंकर भगवान ची उभी मूर्ती प्रत्यक्ष पाहून मन खरोखर प्रसन्न होते .. !!
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
पाषाण हे पुण्यातील शिवाजीनगर पासून सुमारे ६/७ कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण पाषाणला जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यातील शिवाजीनगर पासून आपल्याला अंदाजे १५ ते २० मिनिट लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
सोमेश्वर महादेव मंदिर हे पुण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक असणारे शिवालय म्हणून ओळखले जाते. या मंदिराशेजारूनच राम नदी वाहते. या नदीच्या प्राचीन साहित्यातील उल्लेखांवरून; तसेच मंदिराच्या परिसरातील वीरगळ आणि इतर अवशेषांवरून त्याच्या इतिहासाचे धागे उलगडतात. पुण्यात लाल महालात वास्तव्याला असताना मातुःश्री जिजाऊंसह छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात येत असल्याचे; तसेच या मंदिराची डागडुजीही जिजाऊंनी करून घेतल्याचे दाखले मिळतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. शिवकाल आणि पेशवाईत मंदिराची उत्तम व्यवस्था राखली जात होती.हे मंदिर ७०० वर्ष जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार साक्षात जिजाबाई साहेबां हस्ते झालेला आहे.