श्रीमद् भगवद् गीता भाग ३९ –
अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.३३ ते ३.३६ | श्रीमद् भगवद् गीता भाग ३९ –
मूळ श्लोक –
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३-३३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
भूतानि = सर्वच प्राणी, प्रकृतिम् यान्ति = प्रकृतीप्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्मे करतात, ज्ञानवान्, अपि = ज्ञानी माणूस सुद्धा, स्वस्याः = आपल्या, प्रकृतेः = प्रकृतीला, सदृशम् = अनुसरून, चेष्टते = क्रिया करीत राहातो (मग अशा स्थितीत स्वभावापुढे), निग्रहः = हट्ट, किम् = काय, करिष्यति = करणार ॥ ३-३३ ॥
अर्थ –
सर्व प्राणी आपल्या प्रकृतीला प्राप्त होतात. आपल्या स्वभावाच्या आधीन होऊन कर्मामध्ये प्रवृत्त होतात. साक्षात्कारी ज्ञानी मनुष्यदेखील आपल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. मनुष्य प्राणी आपल्या कर्मात मग्न राहतात; तर ज्ञानी स्वस्वरूपात एकरूप होऊन जगतात. जसा ज्याच्या
प्रकृतीचा प्रभाव असेल तसा तो कार्य करतो. हे स्वयंसिद्ध आहे. यात कोण काय निराकरण करणार? याच कारणामुळे सर्व लोक माझ्या मतानुसार कर्मात प्रवृत्त होऊ शकत नाहीत. ते आशा, ममता, संतापाचा म्हणजेच रागद्वेषाचा त्याग करू शकत नाहीत. त्यामुळे कर्माचे व्यवस्थित आचरण होऊ शकत नाही. हे पुढे अधिक स्पष्ट करतात व दुसरे कारण दाखवतात.
मूळ श्लोक
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३-३४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे = इंद्रिय-इंद्रियाच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये, रागद्वेषौ = राग आणि द्वेष, व्यवस्थितौ = लपून राहिलेले असतात, तयोः = त्या दोघांच्या, वशम् = ताब्यात, (मनुष्यः) = माणसाने, न आगच्छेत् = येता कामा नये, हि = कारण, तौ = ते दोघेही, अस्य = या(माणसा)चे, परिपन्थिनौ = (कल्याणमार्गात) विघ्न करणारे महान शत्रू आहेत ॥ ३-३४ ॥
अर्थ –
प्रत्येक इंद्रिय ब इंद्रियभोगात रागद्वेषांचा वास असतो. या दोघांना बश होता कामा नये. या कल्याणकारक मार्गामध्ये कर्मांपासून मुक्त होण्याच्या पद्धतीमध्ये राग आणि द्वेष हे कटर शत्रू आहेत. ते आराधनेचे अपहरण करतात. जर शत्रू आत आहे तर बाहेर कोण कोणाशी लढेल? शत्रू तर इंद्रिय
व भोगांच्या संसर्गात आहे- अंत:करणात आहे. तेव्हा हे युद्धदेखील अंतःकरणातील आहे, कारण शरीरच क्षेत्र आहे. ज्यात सजातीय व विजातीय अशा दोन्ही प्रवृत्ती, विद्या ब अविद्या तेथे राहतात; जी मायेची दोन अंगे आहेत. या प्रवृत्तींच्या पलीकडे पोहचणे, सजातीय प्रवृत्तींना साध्य करून विजातीय प्रवृत्तींचा अंत करणे हेच युद्ध आहे. विजातीय प्रवृत्ती समाप्त झाल्यावर सजातीयाचा उपयोग देखील समाप्त होतो. स्वरूपाचा स्पर्श करून सजातीयाचा पण त्यांच्या अंतरंगात विलय होणे, या प्रकारे प्रकृतीच्या पलीकडे पोहचणे, हेच युद्ध आहे. रागद्वेषांचे शमन होण्यास वेळ लागतो. म्हणून बरेचसे साधक क्रिया सोडून साधारणत: महापुरुषांची नक्कल करायला लागतात. श्रीकृष्ण यापासून सावध करीत आहेत.
मूळ श्लोक –
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
स्वनुष्ठितात् = चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या, परधर्मात् = दुसऱ्याच्या धर्मापेक्षा, विगुणः = गुणरहित असासुद्धा, स्वधर्मः = स्वतःचा धर्म, श्रेयान् = अति उत्तम आहे, स्वधर्मे = आपल्या धर्मात, निधनम् = मरणे हे सुद्धा, श्रेयः = कल्याणकारक आहे, (च) = आणि, परधर्मः = दुसऱ्याचा धर्म, भयावहः = भय निर्माण करणारा आहे ॥ ३-३५ ॥
अर्थ –
एक साधक दहा वर्षांपासून साधनेत मग्न आहे व दुसरा साधक साधनेत प्रवेश करीत असेल; तर दोघांचीही क्षमता एकासारखी असत नाही. नवीन प्रवेश करणारा साधक जर जुन्या साधकाची नक्कल करेल-अनुकरण करेल तर तो नष्ट होईल.
यावर श्रीकृष्ण म्हणतात की- चांगले आचरण असणाऱ्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आपला धर्म गुणहीन असला तरी तो अधिक उत्तम आहे असे समजावे. स्वभावत: उत्पन्न होणाऱ्या कर्मात प्रवृत्त होण्याची क्षमता म्हणजेच स्वधर्म होय. आपल्या क्षमतेप्रमाणे कर्म करण्यास उद्युक्त होण्याने साधक एक ना एक दिवस पार पोहोचू शकतो. म्हणून स्वधर्माचे आचरण करीत मरणे हे परमकल्याणकारी आहे.
जेथून साधना तुटेल, नवीन शरीर प्राप्त होताच तेथूनच पुन्हा प्रारंभ होईल. आत्मा तर मरत नाही. ( शरीर ) वस्त्र बदलण्याने आपली बुद्धी, विचार बदलत तर नाहीत? पुढे असणार्या, चालणाऱ्या प्रमाणे सोंग घेतल्यास साधक भयभीत होईल. भय प्रकृतींमध्ये असते. परमात्म्यात नसते. प्रकृतीचे आवरण अधिक घट्ट व जाड होईल- या भगवत्पथा मध्ये नकलेचे, अनुकरणाचे प्राबल्य आहे. ‘ पूज्य महाराज श्रींना एक दिवस आकाशवाणी झाली की ‘ अनुसुईया ‘ जंगलात जाऊन राहा. तेव्हा ते जम्पूहून चित्रकूट आले व ‘ अनुसुईया च्या घोर जंगलात रहायला लागले. बरेचसे महात्मा तेथून येत जात होते. एकाने पाहिले की,
परमहंसजी दिगंबर बनून रहात आहेत व त्यांचा सर्वांकडून सन्मान होत आहे, तेव्हा त्याने आपले कोपीन फेकून दिले. दंड-कमंडलू एका दुसऱ्या महात्म्याला देऊन टाकले आणि तो दिगंबर बनला. काही दिवसांनी तो पुन्हा परमहंसजींच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला दिसले की परमहंसजी लोकांशी गप्पा मारीत आहेत, त्यांना शिव्याही देत आहेत. महाराज श्रींना आदेश झाला होता की भक्तांच्या कल्याणासाठी त्यांना थोडा दम देत जावा, त्यांना ताडनही करावे, पण या मार्गावरील पथिकांवर लक्ष ठेवावे. त्यामुळे महाराजश्री लोकांना शिव्या देत होते. त्या महात्म्याने ते पाहिले ब तोही शिव्या देऊ लागला. परंतु त्याच्या शिव्या ऐकून लोकही त्याला अद्वातद्वा बोलू लागले. महात्मा मनात म्हणाला तेथे महाराजांच्या शिव्या खातात- त्यांना कोणी बोलत नाही आणि येथे मला उलटून उत्तरे देतात.
दोन वर्षानंतर तो महात्मा पुन्हा तेथे परतला, तेव्हा त्याने पाहिले की परमहंसजी गादीवर बसले आहेत आणि लोक पंख्याने त्यांना वारा घालीत आहेत व चवऱ्या ढाळीत आहेत. तेव्हा त्या महात्म्याने लगेच जंगलातल्या एका पडक्या वास्तूत तख्त मागविले, गादी बिछवली, दोन माणसांना चवऱ्या ढाळण्यासाठी नियुक्त केले. दर सोमवारी गर्दीही जमवायला लागले. मुलगा पाहिजे असेल तर पन्नास रुपये, मुलगी पाहिजे असेल तर पंचवीस रुपये; परंतु ‘उघरे अन्त न होड निबाहू’ एक महिन्यातच कवडी किंमतीचे बनून तेथून निघून जावे लागले. तात्पर्य या भगवत्पथावर अनुकरण साथ देत नाही. त्याला स्वधर्माचेच आचरण करायला हवे.
पण स्वधर्म काय आहे? दुसर्या अध्यायात श्रीकृष्णाने स्वधर्माचे नाव घेतले होते की तुझा स्वधर्म पाहताही तू युध्द करणेच योग्य आहे. क्षत्रियासाठी यापेक्षा अधिक कल्याणकारक मार्ग दुसरा कोणताही नाही. स्वधर्मामध्ये अर्जुन क्षत्रिय मानला जातो. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, ब्राह्मणाला वेदांचा उपदेश क्षुल्लक जलाशयाप्रमाणे वाटतो. तू वेदांपेक्षा श्रेष्ठ हो आणि ब्राह्मण बन. म्हणजेच स्वधर्मामध्ये परिवर्तन शक्य आहे. येथे पुन्हा सांगितले की, रागद्वेषाच्या काबूत जाऊ नकोस. त्यांना कापून टाक. स्वधर्म श्रेयस्कर आहे. अर्थात येथे त्यांचा असा आशय नाही की, अर्जुनाने कोण्या ब्राह्मणाची नक्कल करून त्याच्यासारखी वेषभूषा करावी.
एकाच कर्मपथाला महापुरुषाने चार भागात वाटून टाकले- निकृष्ट, मध्यम, उत्तम व अति उत्तम या श्रेणीच्या साधकांना क्रमश: शुद्र, वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण ही संज्ञा दिली. शुद्र म्हणजेच कमी क्षमतेच्या कर्मापासून आरंभ होतो आणि क्रमश: उन्नत होत तोच साधक ब्राह्मण बनू शकतो. याच्याही पुढे जेव्हा तो परमात्म्यामध्ये प्रवेश मिळवतो तेव्हा तो “न ब्राह्म न क्षत्रिय: न वैश्यो न शुद्राः चिदानन्दरूप:ः शिव: केवलोहम’. तो वर्णाच्या वर जातो हेच श्रीकृष्णदेखील सांगतात की ‘ चातुर्वर्ण्य मया सृष्टं’ चार वर्णाची रचना मी केली आहे तर मग जन्माच्या आधाराने मनुष्यांची विभागणी केली काय? नाही, ‘गुण कर्म विभागशः’ गुणांच्या आधारे कर्माची वाटणी केली.
कोणते कर्म? सांसारिक कर्म? श्रीकृष्ण म्हणतात नाही, नियत कर्म? नियत् कर्म म्हणजे काय? नियत कर्म म्हणजे यज्ञाची प्रक्रिया ज्यात होते. श्वासाचे उच्छ्श्चासात हवन व उच्छश्वासाने श्वासात हवन, इंद्रिय संयम, इत्यादी ज्याचा शुद्ध अर्थ आहे- योग साधना, आराधना! आराध्य देवापर्यंत पोहचवणारा विधी विशेष म्हणजेच आराधना होय, या आराधनाकर्माचीच चार श्रेणीत विभागणी केली आहे. ज्याच्यामध्ये ज्या प्रकारची क्षमता असेल त्याने त्याच क्षमतेपासून आरंभ केला पाहिजे. हाच सर्वांचा आपला आपला स्वधर्म आहे. जर तो पुढच्यांची नक्कल, अनुकरण करेल तर त्याला ते भयावह होईल. अर्थात तो सर्वथा नष्ट तर होणार नाही कारण यात बीजाचा नाश कधीच होत नाही. हो! तो प्रकृतीच्या दबावामुळे ‘हीन-दीन भयभीत अवश्य होईल. बाल वर्गातील विद्यार्थी स्नातक कक्षेत बसू लागला तर तो काय स्नातक होईल? नाही तो तर आरंभीच्या मूळाक्षरांनाही तो वंचित होऊन जाईल. पुढे अर्जुन प्रश्न ठेवतो की मनुष्य स्वधर्माचे आचरण का करीत नाही?
मूळ श्लोक –
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, वार्ष्णेय = हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), अथ = तर मग, अयम् = हा, पूरुषः = मनुष्य, अनिच्छन् अपि = स्वतःची इच्छा नसताना सुद्धा, बलात् = बळजबरीने, नियोजितः इव = जणू भाग पाडल्यामुळे, केन = कोणाकडून, प्रयुक्तः = प्रेरित होऊन, पापम् = पापाचे, चरति = आचरण करतो ॥ ३-३६ ॥
अर्थ –
हे श्रीकृष्णा, मग स्वतःची इच्छा नसतानाही बळजबरीने करावयास लावल्याप्रमाणे हा पुरुष कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? आपल्या मतानुसार तो का वागत नाही? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात-
क्रमशः
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.