श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५२ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.४१ ते ४.४२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५२.

मूळ श्लोक –

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

धनञ्जय = हे धनंजया(अर्जुना), योगसंन्यस्तकर्माणम्‌ = कर्मयोगाच्या द्वारे ज्याने विधिपूर्वक सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत, ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ = विवेकाच्या द्वारे ज्याने सर्व संशयांचा नाश केला आहे, आत्मवन्तम्‌ = ज्याने अंतःकरण वश करून घेतले आहे अशा मनुष्याला, कर्माणि = कर्मे, न निबध्नन्ति = बद्ध करीत नाहीत ॥ ४-४१ ॥

अर्थ –

हे धनंजया, योगद्वारा ज्याने आपली कर्मे म्हणजे कर्मबंधने नष्ट केली आहेत, परमात्म्याच्या दिव्य ज्ञानाने ज्याचे संशय संपूर्ण नष्ट झाले आहेत अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बद्ध करीत नाहीत. योगद्वारेच कर्मांचे शमन होईल- कर्मबंधने नष्ट होतील व परमात्म्याच्या दिव्य ज्ञानानेच संशय नष्ट होईल. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तस्मात्‌ = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, हृत्स्थम्‌ = हृदयामध्ये असणाऱ्या, एनम्‌ = या, अज्ञानसम्भूतम्‌ = अज्ञानाने निर्माण झालेल्या, आत्मनः संशयम्‌ = आपल्या संशयाला, ज्ञानासिना = विवेकज्ञानरूपी तलवारीने, छित्त्वा = कापून टाकून, योगम्‌ = समत्वरूप कर्मयोगात, आतिष्ठ = स्थित होऊन जा (आणि युद्धासाठी), उत्तिष्ठ = उठून उभा राहा ॥ ४-४२ ॥

अर्थ –

तेव्हा हे भरतवंशी अर्जुना, तू योगामध्ये स्थिर होऊन अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व स्वत:च्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या संशयाचा ज्ञानरूपी खड्गाने छेद करून आपल्या क्षात्रधर्माला उचित अशा कर्मयोगाचा अवलंब कर व युद्धाला सिद्ध हो. जेव्हा साक्षात्कारात विध्न उत्पन्न करणारा संशयरूपी शत्रू मनामध्ये लपलेला आहे, मग बाहेर कोण कोणाबरोबर लढणार? वास्तविक जेव्हा तुम्ही चिंतनाच्या मार्गावर मार्गस्थ होता, तेव्हा संशयातून निर्माण होणाऱया बाह्य प्रवृत्ती विघ्नरूप बनून मार्गात आड येतात. त्या शत्रूप्रमाणे तुमच्यावर भयंकर आक्रमण करतात. इंद्रियांचा संयम करून व यज्ञविधींचे आचरण करीत या विकाररूपी शत्रूंचा नाश करणे म्हणजेच युध्द होय. यामुळेच परमशांती प्राप्त होईल आणि हाच अंतिम विजय आहे.

यानंतर पुढे पराजयाचे नावच राहत नाही.

निष्कर्ष-

या अध्यायाच्या प्रारंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की हा अविनाशी योग त्यांनी प्रथम सूर्याला सांगितला. सूर्याने मनूला व मनूने इश्चाकूला सांगितला व परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षींनी जाणला. अव्यक्त अशा मी हा योग सांगितला. महापुरुषही अव्यक्त स्वरूपातच असतो. शरीर म्हणजे त्याच्या राहण्याचे ठिकाण आहे. अशा महापुरुषाच्या वाणीमध्ये परमात्म्याचा वास असतो. अशा कोणा महापुरुषाकडून हा योग सूर्यद्वारा संचारित होत असतो. त्या परम प्रकाशाचा संचार श्वासामध्ये होतो, म्हणून

हा योग प्रथम सूर्याला सांगितला कारण सूर्य म्हणजेच श्वास होय. श्वासात संचारित होऊन मग तो संस्काराच्या रूपात येतो. श्वासात संचित स्वरूपात राहिल्यानंतर वेळ येताच तो मनात संकल्प बनून येतो. त्याची महानता समजल्यावर मनात त्याच्याविषयी जिज्ञासा जागृत होते आणि मग योग कार्यरूप धारण करतो. क्रमश: विकास करीत करीत योग क्रद्धी-सिद्धींच्या राजर्षी श्रेणीपर्यंत पोहचून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण जो भगवंताचा प्रिय भक्त असतो, अनन्य सखा असतो त्याची महापुरुष काळजी घेतात.

आपला जन्म तर आता झाला मग तुम्ही हा योग सूर्याला सांगितला हे कसे? या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की मी अव्यक्त, अविनाशी, जन्मरहित आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी अधिष्ठित असूनही योग प्रक्रियेद्वारा आपल्या स्वकीय त्रिगुणमयी प्रकृतीला वश करून मी प्रकट होत असतो. प्रकट होऊन ते काय करतात? साध्य गोष्टींचे रक्षण करण्यासाठी आणि ज्यातून दोष निर्माण होतात त्या दोषांचा समूळ नाश करण्यासाठी प्रारंभापासून मी युगायुगामध्ये प्रकट होत असतो. माझा जन्म व कर्म दिव्य आहे. फक्त तत्त्वदर्शी लोकच मला जाणू शकतात. ईश्वराचा अविर्भाव कलियुगाच्या अवस्थेतूनच होत असतो. साधकाच्या प्रारंभिक अवस्थेत त्याला भगवंताचे स्वरूप नीट समजत नाही. तो गोंधळलेला असतो.

‘ पूज्य महाराजश्री ‘ म्हणत की जेव्हा भगवंताची कृपा होते, जेव्हा भगवान आत्म्याचे सारथी बनतात तेव्हा खांबातून, वृक्षातून, पानातून, शून्यातून सारांश प्रत्येक ठिकाणाहून ईश्वराचा आवाज ऐकू येतो. साधकाचा विकास होत होत जेव्हा तो परमात्म्याला जाणतो, तेव्हा स्पर्शाने तो त्याला स्पष्ट जाणतो. यासाठी अर्जुना, माझ्या त्या स्वरूपाला तत्त्वदर्शी लोक पाहतात व माझे स्वरूप जाणून ते तत्क्षणी माझ्यात प्रविष्ट होतात. तेथून ते मग कधीच परतत नाहीत.

पुढे श्रीकृष्ण म्हणाले की, मी प्रेमळ भक्ताच्या हृदयात असतो. बाहेर कधीही असत नाही. त्यांनी पुढे सांगितले की कर्म त्यांना बद्ध करू शकत नाही व जे माझ्यात प्रविष्ट होतात, त्यांनाही कर्म बंधनकारक ठरत नाही. हे जाणूनच मुमुक्ष लोक कर्म करत असतात. यानंतर यज्ञाचे स्वरूप सांगितले. यज्ञ परमतत्त्वाची व परमशांतीची प्राप्ती करून देणारा आहे. तथापि या यज्ञाचे ज्ञान कुठे प्राप्त होईल? यावर श्रीकृष्णांनी हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानयोग्याजबळ जायला सांगितले आहे. येथे योगेश्वर श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे की, हे ज्ञान तू स्वतः नप्न आचरणाने व दृढनिश्वयाने प्राप्त करू शकशील. दुसऱ्याच्या आचरणाने ते तुला प्राप्त होणार नाही व ते ज्ञान प्रारंभी प्राप्त होणार नाही, तर योग सिद्ध झाल्यावरच प्राप्त होईल. तसेच हे ज्ञान म्हणजेच परमात्म्याचा साक्षात्कार हृदयात-अंतरंगात होतो, बाहेर होत नाही. श्रद्धावान, तत्पर, इंद्रियांचा संयम करणारे व संशयरहित पुरुषच हे ज्ञान प्राप्त करू शकतात. तेव्हा हृदयात असणाऱ्या संशयाला वैराग्याच्या खड्गाने कापून टाक. ही हृदयातील लढाई आहे. बाह्य युद्धाशी गीतोक्त युद्धाचे काहीही प्रयोजन नाही.

या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी मुख्यतः यज्ञाचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले आहे की, यज्ञ ज्या विधीनी पूर्ण होत असतो त्या विधींना, क्रियांना ( कार्य प्रणालीला ) कर्म असे म्हणतात या प्रकारे या अध्यायात कर्म म्हणजे काय ते चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.

मूळ चौथ्याऱ्या अध्यायाची समाप्ती –

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥

अर्थ –

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा हा चौथा अध्याय समाप्त झाला.

इति श्रीमत्परमहंस परमानन्दस्य शिष्य स्वामी अडगड़ानन्दकृते
श्रीमदूभगवद्गीताया: ‘यथार्थ गीता’ भाष्ये ‘ यज्ञकर्म-स्पष्टीकरण’ नाम चतुर्थो$ध्याय:।।॥४॥।

या प्रकारे श्रीमत्परमहंस परमानन्दजींचे शिष्य स्वामी अडुगडानन्दकृत श्रीमद्धगवदगीतेवरील भाष्य जे ‘ यथार्थ गीता ‘ यामधील ‘ यज्ञकर्म स्पष्टीकरण ‘ नावाचा चौथा अध्याय समाप्त झाला.

।। हरिः 🕉 तत्सत्‌ ।।

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ५२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment