श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८३ –

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.१३ ते ८.१६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८३.

मूळ श्लोक

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्‌ ।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ॥ ८-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

ओम्‌ = ॐ, इति = अशा, एकाक्षरम्‌ = एक अक्षर रूप, ब्रह्म = ब्रह्माचा, व्याहरन्‌ =  उच्चार करीत (आणि त्याचे अर्थ स्वरूप अशा), माम्‌ = मज निर्गुण ब्रह्माचे, अनुस्मरन्‌ = चिंतन करीत, देहम्‌ = देहाचा, त्यजन्‌ = त्याग करून, प्रयाति = जातो, सः = तो पुरुष, परमाम्‌ = परम, गतिम्‌ = गती, याति = प्राप्त करून घेतो ॥ ८-१३ ॥

अर्थ

जो पुरुष’ ओम इति ‘ ३ हे अक्षर ब्रह्माचे द्योतक आहे, त्याचा जप व माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो त्याला परमगती प्राप्त होते. श्रीकृष्ण एक योगेश्वर, परमतत्त्वामध्ये स्थित असणारे महापुरुष आणि एक सदगुरु होते. योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितले की ‘ ओम’ अक्षर ब्रह्माचे द्योतक आहे,

तू त्याचा जप कर आणि माझे ध्यान कर,  प्राप्ती मिळालेल्या प्रत्येक महापुरुषाचे नाव तेच असते की ज्याची त्याला प्राप्ती होते व ज्यात तो विलीन होतो, म्हणून श्रीकृष्णांनी जप ‘ ७’ चा सांगितला व ध्यान आपले करायला सांगितले. त्यांनी कृष्ण कृष्ण’ असा नामजप करावयास सांगितला नाही. परंतु कालांतराने भाविकांनी त्यांचा नामजप सुरू केला. अर्थात त्यांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे फळ मिळत असते.

कारण योगेश्वरांनी सांगितले आहे की जेथे मनुष्याची श्रद्धा दृढ होते तेथे मीच त्याच्या श्रद्धेला पुष्टी देत असतो. तसेच त्याला तसे फळही देत असतो. भगवान शंकरांनी राम ‘ नामाचा जप करण्यावर भर दिला. ‘रमन्ते योगिन: यास्मिन्‌ स राम ।’ ‘रा’ और ‘म’ के बीच में कबिरा रहा लुकाय ।’ ‘रा’ आणि ‘म’ या दोन अक्षरामधील अन्तरालात ( मोकळ्या जागेत ) आपल्या मनाचा निरोध करण्यास कबीरांना शक्‍य झाले. श्रीकृष्ण ओमवर भर देतात. ओहं स ओम म्हणजे ती सत्ता माझ्या आत आहे तिला बाहेर शोधण्याची जरूर नाही. हा ओमदेखील त्या परम सत्तेचा परिचय देऊन शांत होत असतो. वास्तवात त्या प्रभूची अनन्त नामे आहेत. परंतु जपासाठी तेच नाम अत्यंत योग्य असते; जे छोटे असते, जे श्वासामध्ये विलीन होते आणि परमात्म्याचा जे बोध करवते. याव्यतिरिक्त अनेक देवी देवतांच्या अविवेकपूर्ण कल्पनांमध्ये अडकून राहून मूळ लक्ष्यापासून विचलित होऊ नका.

पूज्य महाराजश्री सांगत की – “माझे रूप पहा, पण आपल्या श्रद्धेनुसार कोणतेही दोन-अडीच अक्षरांचे नाम ‘ ३७’, ‘ राम’, ‘शिव’ यांपैकी कोणतेही एक नाम घ्या आणि त्याच्या अर्थानुसार इृष्टदेवाच्या स्वरूपाचे ध्यान करा”.

ध्यान सदगुरुचेच केले जाते. तुम्ही राम, कृष्ण अथवा “वीतराग विषयं वा चित्तम्‌’  विरक्त महात्म्यांचे किंवा  ‘यथाभिमतध्यानाद्वा’ ( पातंजल योग १/३७, ३९ ) कोणाच्याही स्वरूपाचे ध्यान केलेत की तुम्हाला ते अनुभवात प्राप्त होईल आणि आपल्या एखाद्या समकालीन सदगुरुकडे ते तुम्हांला पोहचवतील. तेथे त्या सदगुरुच्या मार्गदर्शनाने तुम्ही हळूहळू प्रकृतीच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊ शकाल. प्रारंभी मीसुद्धा एका देवतेच्या ( श्रीकृष्णाच्या विराट रूपाचे ) चित्राचे ध्यान करीत असे; परंतु महाराजश्रींच्या मार्गदर्शनामुळे नंतर ते शांत झाले. प्राथमिक अवस्थेतील साधक नामजप तर करतात; परंतु महापुरुषाच्या स्वरूपाचे ध्यान करायला ते कचरतात. त्यांना प्राप्त झालेल्या संस्कारामुळे त्यांचे जे पूर्वग्रह तयार होतात, ते ते सोडू शकत नाही. ज्या देवतांचा श्रीकृष्णांनी निषेध केला आहे, त्यांचे ते ध्यान करतात. तेव्हा पूर्ण समर्पणाबरोबर एखाद्या अनुभवी महापुरुषाला शरण जावे. पुण्य- पुरुषार्थ सबल होताच मनातील कुतर्क नष्ट होतात व यथार्थ क्रियेमध्ये प्रवेश मिळतो.

योगेश्वर श्रीकृष्णांच्या अनुसार या प्रकारे’ ३७’  चा जप आणि परमात्मस्वरूप सदगुरुच्या स्वरूपाचे निरंतर स्मरण केल्याने मनाचा निरोध व विलय होत जातो आणि मग त्याच क्षणी शरीराशी असणाऱ्या संबंधाचा मन त्याग करते. केवळ मृत्यूमुळे शरीर पाठ सोडत नाही.

मूळ श्लोक

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।

तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ ८-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), (मयि) = माझ्या ठिकाणी, अनन्यचेताः = अनन्यचित्त होऊन, यः = जो पुरुष, नित्यशः = सदाच, सततम्‌ = निरंतर, माम्‌ = मज पुरुषोत्तमाचे, स्मरति = स्मरण करतो, तस्य = त्या, नित्ययुक्तस्य = नित्य निरंतर माझ्यामध्ये युक्त असणाऱ्या, योगिनः = योग्यासाठी, अहम्‌ = मी, सुलभः = सुलभ आहे म्हणजे मी त्याला सहज प्राप्त होतो ॥ ८-१४ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), माझ्या व्यतिरिक्त चित्तामध्ये दुसरे कोणीच नाही”- त्या अन्य कोणाचे चिंतन न करता, एकाग्र चित्ताने माझे ठायी स्थिर होऊन जो निरंतर माझे स्मरण करतो त्या माझ्याशी निरंतर युक्‍त असणाऱ्या योग्याला मी सहज प्राप्त होतो. आपल्या असे सुलभ होण्याने काय प्राप्त होईल? काय मिळेल?

मूळ श्लोक

मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्‌ ।

नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ ८-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

परमाम्‌ = परम, संसिद्धिम्‌ = सिद्धीला, गताः = प्राप्त करून घेतलेले, महात्मानः = महात्मे लोक, माम्‌ = मला, उपेत्य = प्राप्त करून घेतात (तो), दुःखालयम्‌ = दुःखांचे घर (तसेच), अशाश्वतम्‌ = क्षणभंगुर (असा), पुनर्जन्म = पुनर्जन्म, न आप्नुवन्ति = प्राप्त करून घेत नाहीत ॥ ८-१५ ॥

अर्थ

मला प्राप्त केल्याने दुःखाचे आगर असणारा व नश्वर, अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही;  परंतु त्यांना परमसिद्धी प्राप्त होते. अर्थात मला मिळणे किंवा परमसिद्धी प्राप्त होणे दोन्ही एकच गोष्ट आहे. केवळ परमेश्वरच असे आहेत को, ज्यांना प्राप्त केल्यानंतर पुनर्जन्म नष्ट होतो. मग पुनर्जन्माची सीमा कुठपर्यंत आहे?

मूळ श्लोक

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।

मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ ८-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, आब्रह्मभुवनात्‌ = ब्रह्मलोकापर्यंत, लोकाः = सर्व लोक, पुनरावर्तिनः = पुनरावर्ती आहेत, तु = परंतु, कौन्तेय = हे कौन्तेया(कुंतीपुत्र अर्जुना), माम्‌ = मला, उपेत्य = प्राप्त करून घेतल्यावर, पुनर्जन्म = पुनर्जन्म, न विद्यते = होत नाही ॥ ८-१६ ॥

अर्थ

हे अर्जुना, ब्रह्मापासून कीटकादि पतंगापर्यंत सर्व लोकीचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत.  जन्म घेणे व मरणे या फेऱ्यात ते सतत फिरणारे आहेत. परंतु कोन्तेया, मजप्रत आल्यानंतर त्या पुरुषाचा पुनर्जन्माचा फेरा नष्ट होतो.

धर्मग्रंथांमधील लोकलोकान्तराच्या परिकल्पना म्हणजे ईश्वर- पथावरील विभूतींना बोध करण्याचा केवळ एक आन्तरिक अनुभव किंवा रूपक आहे. अंतरिक्षात ना असा कोणता खड्डा आहे की, जेथे किडे चावायला येतात, आणि ना असा महाल आहे की ज्याला स्वर्ग म्हंटले जाते.  दैवी संपेदेने युक्‍त असणारे पुरुष देवता आणि आसुरी गुणांनी युक्‍त असणारे पुरुष आसुर असतात. श्रीकृष्णांच्याच नात्यातील कंस राक्षस आणि बाणासुर दैत्य होता. देव, मानव, तिर्यक योनी म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे लोकच होत. श्रीकृष्णांच्या मते हा जीवात्मा मनासह पाच इंद्रियांना घेऊन जन्म-जन्मांतरांच्या संस्काराप्रमाणे नवीन शरीर धारण करीत असतो.

ज्यांना अमर म्हंटले जाते असे देवतागणही मरण पावणारे आहेत. ‘ क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशान्ति’  यापेक्षा अधिक नुकसान काय असणार? ते देव-शरीरही काय कामाचे, की ज्याचे संचित पुण्यही समाप्त होऊन जाते, संपून जाते? देवलोक, पशुलोक, पतंगादि कीटक लोक, भोगलोक मात्र आहेत. केवळ मनुष्यच कर्माचा रचणारा आहे. त्या कर्माद्वारा ते परमधाम प्राप्त करू शकतो की, जेथून मनुष्य परत जन्माला येत नाही. यथार्थ कर्माचे आचरण करून मनुष्य देवता बनू शकतो, ब्राह्मी स्थिती प्राप्त करू शकतो; परंतु जोपर्यंत मनाचा निरोध करून, मनाचा परमात्म्यात विलय करून, त्या परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करून, त्या परमभावामध्ये जोपर्यंत तो स्थिर होत नाही तोपर्यंत त्याचा पुनर्जन्म चुकणार नाही. उपनिषदे या सत्याचे स्पष्टीकरण करताना सांगतात.

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा ये$स्य हृदिस्थिताः ।

अथ मर्त्यो$्मृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते ॥। ( कठो०, २/३/१४)

जेव्हा हृदयामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या वासना समूळ नष्ट होतात,  तेव्हा मर्त्य असणारा मनुष्य अमर होतो आणि येथेच या जगात त्याच मनुष्य शरीरात तो परब्रह्माचा साक्षात अनुभव घेतो.

प्रश्न असा निर्माण होतो की ब्रह्मासुद््धा मृत्यू पावणारा म्हणजे नश्वर आहे की काय?  तिसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी प्रजापती ब्रह्माच्या बाबतीत विवरण करताना सांगितले होते की, परमपदाची प्राप्ती झाल्यानंतर बुद्धी अगदी यंत्रवत असते. तिच्याद्वारे परमात्माच व्यक्त होत असतो.  अशा महापुरुषांकडूनच यज्ञाची संरचना झालेली आहे आणि येथे मात्र ते म्हणतात की, ब्रह्माची स्थिती प्राप्त करणार्‍याला देखील पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणजे योगेश्वर श्रीकृष्णांना काय सांगावयाचे आहे?

वास्तविक ज्या महापुरुषांच्या द्वारे परमात्मा व्यक्त होत असतो त्या महापुरुषांची बुद्धीसुद्धा ब्रह्म नसते.  परंतु लोकांना उपदेश देण्यासाठी, कल्याणकारी मार्गाचे नियम सांगण्यासाठी त्यांना ब्रह्मा म्हटले जाते. ते खरोखर

ब्रह्म नसतात. त्यांच्याजवळ त्यांची स्वतःची बुद्धी राहतच नाही. परंतु त्याच्या आधीच्या साधनाकाळामध्ये बुद्धीच ब्रह्म आहे.

“अहंकार शिव, बुद्धी आज, मन, शशि, चित्त महान”

सर्वसाधारण मनुष्याची बुद्धी मात्र ब्रह्म नसते.  बुद्धी जेव्हा इष्टदेवामध्ये प्रवेश करू लागते तेव्हापासून ब्रह्माची रचना होऊ लागते. त्याचे मुनीजनांनी चार मार्ग सांगितलेले आहेत. तिसर्‍या अध्यायात ते सांगितलेले आहेत. स्मरणासाठी ते पुन्हा पाहा – ब्रह्मवित, ब्रह्मविहर, ब्रह्मविद्ठरीयान, ब्रह्मविद्ठरिष्ट । ब्रह्मविद्षेशी जोडलेली जी बुद्धी आहे ती ब्रह्मवित बुद्धी होय. ब्रह्मविद्येमध्ये ज्याने श्रेष्ठत्व प्राप्त केले आहे तो ब्रह्मविद्ठर होय. ब्रह्मविद्ठरीयान ती बुद्धी आहे की, जिच्यामुळे तो ब्रह्मविद्येत केवळ दक्षच नव्हे तर तिचा नियंत्रक व संचालक बनतो. ब्रह्मविद्दरिष्ट बुद्धीचा तो अंतिम स्तर आहे.ज्यातून इष्ट प्रवाहित होते. येथपर्यंत बुद्धीचे अस्तित्व असते कारण प्रवाहित होणारा इष्टदेव अजून वेगळा आहे आणि ग्रहणकर्ती बुद्धी वेगळी आहे. अजून तो प्रकृतीच्या सीमेमध्येच आहे. अशी श्रेष्ठ अवस्था प्राप्त झालेला पुरुषही पुनर्जन्माच्या सीमेमध्ये आहे. बुद्धी ( ब्रह्म ) राहते, जागृत असते तेव्हा संपूर्ण भूत ( चिंतनाचा प्रवाह )  जागृत असतो आणि जेव्हा बुद्धी अविद्येमध्ये राहते तेव्हा ती अचेतन असते. यालाच रात्र आणि दिवस, प्रकाश आणि अंध:कार असे म्हंटले जाते.

ब्रह्म म्हणजे ब्रह्मविद्धतेची जी श्रेणी, ज्यात इष्टदेव प्रवाहित झालेला आहे,  तिला प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट बुद्धीमध्येदेखील विद्येचा ( जी स्वयं प्रकाशस्वरूप आहे, जी त्यात प्रवाहित करते ) दिवस व अविद्येची रात्र, प्रकाश आणि अंध:कार याचा क्रम लागून राहिलेला आहे. इथपर्यंत साधकामध्ये माया यशस्वी होते. प्रकाशकालात अचेतन प्राणिमात्र सचेतन होतात. त्यांना लक्ष्य दिसू लागते. तसेच बुद्धीच्या अंतरालात अविद्येची रात्र प्रवेश करताच सर्व भूतमात्र अचेतन होऊन जातात. बुद्धी निश्चय करू शकत नाही. स्वरूपाकडे जाणे बंद होऊन जाते. हाच ब्रह्माचा दिवस आहे आणि हीच ब्रह्माची रात्र आहे. दिवसाच्या प्रकाशात बुद्धीच्या हजारो प्रवृत्तीमध्ये ईश्वरी प्रकाश पसरला जातो आणि अविद्देच्या रात्री या हजारो प्रवृत्तीमध्ये अचेतनावस्थेचा अंध:कार व्यापून राहतो.

शुभ आणि अशुभ, विद्या आणि अविद्या या दोन्ही प्रवृत्ती शांत झाल्यानंतर म्हणजेच अचेतन आणि सचेतन,  रात्रीत विलीन होणारे आणि दिवसा उत्पन्न होणारे असे दोन्ही प्रकारचे भूतमात्र ( संकल्प प्रवाह ) नष्ट झाल्यावर त्या  अव्यक्त बुद्धीच्याही पलीकडे असणारा शाश्वत असा अव्यक्त भाव प्राप्त होतो, जो पुन्हा कधी नष्ट होत नाही. भूतमात्रांची अचेतन व सचेतन अशा दोन्ही प्रकारच्या अवस्था संपल्यानंतरच तो सनातन भाव प्राप्त होत असतो.

बर सांगितलेल्या बुद्धीच्या चार अवस्थेनंतरचा पुरुष हाच महापुरुष असतो. त्याच्या अंतरंगात बुद्धी नसते,  ती परमात्म्याच्या यंत्रासारखी होते. परंतु तो लोकांना उपदेश करतो, निश्चितपणे प्रेरणा देतो, म्हणून त्याच्यामध्ये बुद्धी प्रतीत होते. परंतु तो बुद्धीच्या स्तरापलीकडे गेलेला आहे. तो परम अव्यक्त भावामध्ये स्थिर झालेला आहे.  आता त्याचा पुनर्जन्म होणार नाही. परंतु या अव्यक्त स्थितीच्या पूर्वी जोपर्यत त्याच्यापाशी आपली बुद्धी आहे, जोपर्यंत तो ब्रह्म आहे, तोपर्यंत तो पुनर्जन्माच्या फेऱ्यात फिरणार आहे. तोपर्यंत तो पुनर्जन्माच्या परिमितीतच आहे. याच तथ्यांवर प्रकाश टाकीत योगेश्वर श्रीकृष्ण सांगतात –

क्रमशः  श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८३

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment