श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८४ –

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग – श्लोक क्र. ८.१७ ते ८.२०| श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८४.

मूळ श्लोक

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।

रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ ८-१७ ॥

➡संदर्भित अन्वयार्थ

ब्रह्मणः = ब्रह्मदेवाचा, यत्‌ = जो, अहः = एक दिवस आहे, (तत्‌) = तो, सहस्रयुगपर्यन्तम्‌ = एक हजार चतुर्युगांपर्यंतची अवधी असणारा आहे, (च) = आणि, रात्रिम्‌ (अपि) = रात्र ही सुद्धा, युगसहस्रान्ताम्‌ = एक हजार चतुर्युगांपर्यंतची अवधी असणारी आहे (असे), (ये) = जे पुरुष, विदुः = तत्त्वतः जाणतात, ते = ते, जनाः = योगी लोक, अहोरात्रविदः = कालाचे तत्त्व जाणणारे आहेत ॥ ८-१७ ॥

➡अर्थ

हजार चतुर्युगांची ब्रह्माची रात्र असते व हजार चतुर्युगांचा ब्रह्माचा दिवस असतो. ही गोष्ट जे पुरुष प्रत्यक्ष जाणतात ते ‘ समय तत्त्वाला’ यथार्थपणे जाणतात.

प्रस्तुत श्लोकात दिवस व रात्र, विद्या आणि अविद्या यांचे रूपक आहे. ब्रह्मविद्येशी संयुक्त असणारी बुद्धी ब्रह्माची प्रवेशिका आहे, तसेच ब्रह्मविद्ठरिष्ट बुद्धी म्हणजे ब्रह्माची पराकाष्ठा आहे. विच्येशी संयुक्त असणारी बुद्धीच ब्रह्मदेवाचा दिवस आहे. जेव्हा विद्या कार्यरत होते तेव्हा योगी स्वरूपाकडे अग्रेसर होत असतो व मग अंतःकरणातील सहस्त्र प्रवृत्तींमध्ये ईश्वरीय प्रकाशाचा

संचार होतो. त्याच प्रकारे अविद्यारूपी रात्र सुरू होते, तेव्हा अंतःकरणाच्या सहस्त्र प्रवृत्तीमध्ये मायेचे दन्द्र प्रवाहित होते. प्रकाश आणि अंधकाराच्या या मर्यादा आहेत. यानंतर ना विद्येचे अस्तित्व राहते, ना अविद्येचे, कारण ते परमतत्त्व परमात्मा विदित होते. जे हे तत्त्व उत्तम प्रकारे जाणतात ते योगीजन कालतत्त्व जाणणारे आहेत. अविद्येची रात्र केव्हा होते व विद्येचा दिवस केव्हा येतो हे कालतत्त्व ते चांगल्या प्रकारे जाणतात. कालाचा प्रभाव केव्हापर्यंत राहणार आहे किंवा समय कुठपर्यंत पाठलाग करणार आहे हे त्यांना चांगले माहीत असते.

सुरुवातीचे मुनीजन अंतःकरणाला चित्त अथवा कधी कधी केवळ बुद्धी म्हणून संबोधित असत. कालान्तराने अंत:करणाचे विभाजन मन, बुद्धी, चित्त व अहंकार या चार प्रमुख प्रवृत्तीमध्ये केले गेले. तसे पाहता अंतःकरणाच्या

प्रवृत्ती अनन्त आहेत, पण मुख्य या चार प्रवृत्ती होत. बुद्धीच्या अंतरंगातच अविद्योची रात्र होते व त्या बुद्धीमध्ये विद्येचा दिवसही होतो. हीच ब्रह्माची रात्र आणि दिवस आहे. जगत्रूपी रात्रीमध्ये सर्व जीव अचेतन पडलेले आहेत.

प्रकृतीमध्ये विचरण करत असणारी त्यांची बुद्धी ह्या प्रकाशस्वरूपाला पाहू शकत नाही. परंतु योगचरण करणारे योगी यामुळे जागे होतात व ते स्वरूपाकडे आगेकूच करतात. ज्याप्रमाणे गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसामध्ये लिहिले आहे.

कबहूं दिवस महे निविडुतम, कबहुंक प्रगट पतंग ।

बिनसइ उपजड ज्ञान जिमि, पाह कुसंग सुसंग ।।

( रामचरित मानस, ४/१५ ख )1।

विद्येशी संयुक्त असणारी बुद्धी कुसंगामुळे अविद्येत परिणत होते पुन्हा सुसंगामुळे-सत्संगामुळे विद्येचा संचार त्याच बुद्धीमध्ये होतो. हा चढ-उतार लक्ष्यपूर्तीपर्यत चालूच राहतो. पूर्ततेनंतर नाही बुद्धी की नाही ब्रह्मा , नाही रात्र की नाही दिवस! हे ब्रह्माच्या दिवस-रात्रीचे रूपक आहे. ना हजारो वर्षाची मोठी रात्र असते, ना हजारो चतुर्यगांचा दिवस असतो किंवा ना चार मुखांचा ब्रह्म असतो. वर सांगितलेल्या ज्या चार क्रमिक अवस्था आहेत त्या म्हणजेच ब्रह्माची चार मुखे होत आणि अंतःकरणाच्या चार प्रमुख मुख्य प्रवृत्ती म्हणजेच त्याची चतुर्युगे होत. रात्रंदिवस ते या प्रवृत्तींमध्येच असतात. जे पुरुष या भेदाला तत्त्वाने जाणतात, तेच योगीजन कालाच्या भेदालाही ओळखतात की, समय कुठपर्यंत पाठलाग करतो आणि कोणता पुरुष कालाच्या पलीकडे जाऊ शकतो? रात्र व दिवस अविद्या आणि विद्या यांच्यामध्ये होणारे कार्य श्रीकृष्ण पुढील श्लोकात स्पष्ट करताना म्हणतात

मूळ श्लोक

अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।

रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसञ्ज्ञके ॥ ८-१८ ॥

➡संदर्भित अन्वयार्थ

अहरागमे = ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रवेशकाळी, सर्वाः = संपूर्ण, व्यक्तयः = चराचर भूतसमूह हे, अव्यक्तात्‌ = अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून, प्रभवन्ति = उत्पन्न होतात, (च) = आणि, रात्र्यागमे = ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रवेशकाळात, तत्र = त्या, अव्यक्तसञ्ज्ञके एव = अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरामध्येच, प्रलीयन्ते = लीन होऊन जातात ॥ ८-१८ ॥

➡अर्थ

ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होताच म्हणजे विद्येच्या प्रकाशात सर्व प्राणी अव्यक्त बुद्धीमध्ये जागृत होतात आणि रात्र सुरू होताच त्या अव्यक्त, अदृश्य बुद्धीमध्ये जागृतीचे सूक्ष्म तत्व अचेतन होते. ते प्राणी अविद्यारूपी रात्रीचे वेळी स्वरूपाला स्पष्ट पाहू शकत नाही; परंतु त्यांचे अस्तित्व असते. म्हणजे

जागृत होणे व अचेतन होणे या दोन्ही गोष्टींचे माध्यम ही बुद्धीच आहे, जी सर्वात अव्यक्तरूपाने वास करीत असते, ती दृष्टिगोचर नसते.

मूळ श्लोक

भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।

रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ ८-१९ ॥

➡संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), सः एव = तोच, अयम्‌ = हा, भूतग्रामः = भूतसमुदाय, भूत्वा भूत्वा = वारंवार उत्पन्न होऊन, अवशः = प्रकृतीला वश होऊन, रात्र्यागमे = रात्रीच्या प्रवेशकाळी, प्रलीयते = लीन होऊन जातो, (च) = आणि, अहरागमे = दिवसाच्या प्रवेशकाळी, (पुनः) = पुन्हा, प्रभवति = उत्पन्न होतो ॥ ८-१९ ॥

➡अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), सर्व प्राणी या प्रकारे जागृत झाल्यावर, प्रकृतीमुळे विवश होऊन अविद्यारूपी रात्र येताच अचेतन होतात. आपले लक्ष्य काय आहे ते सुध्दा ते पाहू शकत नाहीत. दिवस सुरु होताच ते पुन्हा जागृत होतात. जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत तिच्या अंतरंगात विद्या आणि अविद्या यांचा असा क्रम सुरूच असतो. तोपर्यंत तो साधकच असतो, महापुरुष बनत नाही.

मूळ श्लोक

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।

यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ ८-२० ॥

➡संदर्भित अन्वयार्थ

तु = परंतु, तस्मात्‌ = त्या, अव्यक्तात्‌ = अव्यक्तापेक्षा अतिशय, परः = पर (असा), अन्यः = दुसरा म्हणजे वेगळा, यः = जो, सनातनः = सनातन, अव्यक्तः = अव्यक्त, भावः = भाव आहे, सः = तो (परम दिव्य पुरुष), सर्वेषु = सर्व, भूतेषु = भूते, नश्यत्सु = नष्ट झाल्यावर (सुद्धा), न विनश्यति = नष्ट होत नाही ॥ ८-२० ॥

➡अर्थ

एक तर ब्रह्म म्हणजे बुद्धी अव्यक्त आहे. ती इंद्रियांना दिसत नाही. तिच्याही पलीकडे सनातन अव्यक्त तत्त्व आहे जे सर्व भूतमात्रांचा नाश झाला असताही स्वत: विनाश पावत नाही. म्हणजे विद्येमध्ये सचेतन आणि अविद्येमध्ये अचेतन, दिवसा उत्पन्न आणि रात्रीमध्ये विलीन होणारा अव्यक्त

ब्रह्मा नष्ट होतो व मग सनातन तत्त्व प्राप्त होते, जे कधीही नष्ट होत नाही. बुद्धीमध्ये वर सांगितलेले असे जे तत्त्व मिळते, तेच माझे ‘ परमधाम ‘ आहे जेव्हा सनातन अव्यक्त तत्त्वाची प्राप्ती होते, तेव्हा बुद्धीही त्याच भावात रंगून जाते व तोच भाव धारण करते. म्हणून ती बुद्धी स्वतः जेव्हा संपून जाते, तेव्हा त्या ठिकाणी सनातन अव्यक्त तत्त्वच शिल्लक राहते.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८४.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment