श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८८ –

अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग – श्लोक क्र. ९.०५ ते ९.०८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८८.

मूळ श्लोक –

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्‌ ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ९-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भूतानि = ती सर्व भूते, मत्स्थानि = माझ्यामध्ये स्थित, न = नाहीत (परंतु), मे = माझी, ऐश्वरम्‌ = ईश्वरीय, योगम्‌ = योगशक्ती, पश्य = पाहा, भूतभृत्‌ = भूतांचे धारण-पोषण करणारा, च = आणि, भूतभावनः च = भूतांना उत्पन्न करणारा असतानाही, मम = माझा, आत्मा = आत्मा (वस्तुतः), भूतस्थः न = त्या भूतांमध्ये स्थित नाही ॥ ९-५ ॥

अर्थ

सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत असे म्हणणेही व्यर्थ आहे, कारण ते सर्व नश्वर आहेत – ते सर्व मरण पावणारे आहेत. ते प्रकृतीचे आश्रित आहेत. परंतु माझे योगमायेचे ऐश्वर्य पहा की, सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करणारा आणि त्यांचे पोषण करणारा माझा आत्मा त्यांच्या ठिकाणी नाही. मी आत्मस्वरूप असल्याने सर्व भूतांच्या ठिकाणी स्थित नाही. हाच योगाचा प्रभाव किंवा सामर्थ्य आहे. हेच स्पष्ट करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णांनी पुढे दृष्टांत दिला आहे.

मूळ श्लोक

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्‌ ।

तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ९-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यथा = ज्याप्रमाणे (आकाशातून उत्पन्न झालेला), (च) = आणि, सर्वत्रगः = सर्वत्र संचार करणारा, महान्‌ = महान, वायुः = वायू हा, नित्यम्‌ = सदा, आकाशस्थितः = आकाशामध्येच स्थित असतो, तथा = त्याप्रमाणे (माझ्या संकल्पातून उत्पन्न होणारी), सर्वाणि = संपूर्ण, भूतानि = भूते, मत्स्थानि = माझ्यामध्ये स्थित आहेत, इति = असे, उपधारय = जाण ॥ ९-६ ॥

अर्थ

आकाशात उत्पन्न होणारा महान वायू आकाशात सर्वत्र व्याप्त आहे; परंतु तो आकाशाला मलीन करू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे जाण; बरोबर अशाच प्रकारे म्हणजे आकाशाप्रमाणे मी निर्लप आहे. ते मला मलीन करू शकत नाहीत. हा सर्व

योगाचा प्रभाव आहे. आता यानंतर योगेश्वर योगी करतो काय? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात –

मूळ श्लोक

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌ ॥ ९-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), कल्पक्षये = कल्पाच्या अंती, सर्वभूतानि = सर्व भूते, मामिकाम्‌ = माझ्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीप्रत, यान्ति = प्राप्त होतात म्हणजे प्रकृतीमध्ये लीन होतात, (च) = आणि, कल्पादौ = कल्पाच्या आरंभी, तानि = त्यांना, अहम्‌ = मी, पुनः = पुन्हा, विसृजामि = उत्पन्न करतो ॥ ९-७ ॥

अर्थ

हे अर्जुना, कल्पान्ती सर्व भूतमात्रे माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होतात, स्वभावाला प्राप्त होतात आणि कल्पाच्या प्रारंभी मी त्यांना पुनःपुन्हा: “विसृजामि ‘ विशेष रूपाने निर्माण करतो. ही भूते प्रथमपासूनच होती; परंतु ती

विकृत होती. त्यांचीच मी पुन्हा रचना करतो – त्यांना सजवतो. जे अचेतन आहेत, त्यांना जागृत करतो. कल्पासाठी त्यांना प्रेरणा देतो. कल्प याचा अर्थ

आहे उत्थानमुख प्रगतिशील परिवर्तन! आसुरी संपदेतून मुक्त होऊन जसजसा पुरुष दैवी संपदेमध्ये प्रवेश करतो, तेथूनच कल्पाचा प्रारंभ होतो, आणि जेव्हा तो ईश्वरभावामध्ये लय पावतो तेव्हा कल्पाचा क्षष असतो. आपले कर्म पूर्ण करून कल्पही विलय पावत असते. भजनाचा आरंभ म्हणजे कल्पाचा प्रारंभ आहे आणि भजनाची पराकाष्ठा म्हणजे जेथे लक्ष्य विदित होते – समजते तो कल्पाचा अंत होय. जेव्हा हा प्रत्यगात्मा – पुनरावर्तन करणारा – योनीजन्मास कारणीभूत असणाऱ्या राग द्वेषापासून मुक्त होऊन आपल्या शाश्वत स्वरूपात स्थिर होतो, यालाच श्रीकृष्ण माझ्या प्रकृतीला प्राप्त झाला असे म्हणतात.

जो महापुरुष प्रकृतीमध्ये विलय करून स्वरूपामध्ये प्रवेश मिळवतो त्याची प्रकृती कशी असते? त्याच्यामध्ये प्रकृती शोष असते का? नाही, तसे नसते तिसऱ्या अध्यायात ( एलोक ३३ ) श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, सर्व

आपल्या प्रकृतीला प्राप्त होतात. त्यांच्यावर प्रकृतीच्या ज्या गुणांचा प्रभाव असेल तसे ते करतात आणि *ज्ञानवानपि’ प्रत्यक्ष दर्शनाबरोबर मला जाणणारा ज्ञानीसुध्दा आपल्या प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे वागत असतो. मागून येणाऱयांच्या कल्याणासाठी तसे तो वागत असतो. पूर्ण ज्ञानी असणाऱ्या तत्त्वस्थित महापुरुषाची राहणी हीच त्याची प्रकृती असते. तो आपल्या या स्वभावाप्रमाणे

वागत असतो. कल्पांती लोक महापुरुषाच्या या राहणीमध्ये लीन होतात. महापुरुषाच्या या कृतीवर योगेश्वर पुन्हा प्रकाश टाकताना म्हणतात –

मूळ श्लोक

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।

भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌ ॥ ९-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

स्वाम्‌ = स्वतःच्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीचा, अवष्टभ्य = अंगीकार करून, प्रकृतेः वशात्‌ = आपापल्या स्वभावाने, अवशम्‌ = परतंत्र झालेल्या, इमम्‌ कृत्स्नम्‌ = या संपूर्ण, भूतग्रामम्‌ = भूतसमुदायाला, पुनः पुनः = पुन्हा पुन्हा (त्यांच्या कर्मांनुसार), विसृजामि = मी उत्पन्न करतो ॥ ९-८ ॥

अर्थ

मी आपल्या प्रकृतीच्या म्हणजेच महापुरुषांच्या राहणीचा अंगीकार करून ‘प्रकृते वेशात ‘ आपापल्या स्वभावात स्थिर असणारे, प्रकृतीच्या गुणांमुळे पराधीन असलेले सर्व भूतसमुदाय मी पुनः पुन: ‘ विसृजामि ‘ विशेषरूपाने

निर्माण करतो, विशेष रूपाने त्यांना सजवतो, त्यांना आपल्या स्वरूपाकडे जाण्याची प्रेरणा देतो. याचा अर्थ तुम्ही कर्माने बद्ध आहात. हे स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ८८.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment