श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९१ –

अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग – श्लोक क्र. ९.१७ ते ९.२० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९१.

मूळ श्लोक

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ ९-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अस्य = या, जगतः = संपूर्ण जगाचा, धाता = धाता म्हणजे धारण करणारा आणि कर्मांचे फळ देणारा, पिता = पिता, माता = माता, पितामहः = पितामह, वेद्यम्‌ = जाणण्यास योग्य, पवित्रम्‌ = पवित्र, ओङ्कारः = ॐ कार, (तथा) = तसेच, ऋक्‌ = ऋग्वेद, साम = सामवेद, च = आणि, यजुः = यजुर्वेद (सुद्धा), अहम्‌ एव = मीच आहे ॥ ९-१७ ॥

अर्थ

अर्जुना मीच या संपूर्ण जगाचा ‘ धाता ‘ म्हणजे धारण करणारा, ‘पिता’ म्हणजे पालन करणारा, ‘माता ‘ म्हणजे उत्पन्न करणारा आहे. मीच ‘ पितामह: ‘ म्हणजे मूळ उद्गम आहे, ज्यात सर्व प्रवेश मिळवतात. जाणण्यास योग्य

असणारा ओंकार म्हणजेच अहम आकारः इति कारः तो परमात्मा माझ्या स्वरूपात आहे. ‘ सोहं, तत्वमसि ‘ इत्यादी एक दुसर्‍याचे पर्याय आहेत. असे जाणण्यास योग्य स्वरूप मीच आहे. ‘ क्रक ‘ म्हणजे संपूर्ण प्रार्थना, साम ‘ म्हणजे समत्व देवविणारी प्रक्रिया, ‘ यजु: ‘ म्हणजे यज्ञाचा विधीविशेष मीच आहे. योग अनुष्ठानाची वर सांगितलेली तिन्ही आवश्यक अंगे माझ्यात आहेत.

मूळ श्लोक

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥ ९-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

गतिः = प्राप्त करून घेण्यास योग्य असे परमधाम, भर्ता = सर्वांचे भरण-पोषण करणारा, प्रभुः = सर्वांचा स्वामी, साक्षी = शुभ व अशुभ पाहणारा, निवासः = सर्वांचे निवासस्थान, शरणम्‌ = शरण जाण्यास योग्य, सुहृत्‌ = प्रत्युपकाराची इच्छा न धरता सर्वांचे हित करणारा, प्रभवः प्रलयः = सर्वांची उत्पत्ती व प्रलय यांचा हेतू, स्थानम्‌ = स्थितीचा आधार, निधानम्‌ = निधान, (च) = आणि, अव्ययम्‌ = अविनाशी, बीजम्‌ = कारण (सुद्धा), (अहम्‌ एव) = मीच आहे ॥ ९-१८ ॥

अर्थ

हे अर्जुना, ‘ गतिः ‘ म्हणजे प्राप्त करण्यास योग्य परमगती. ‘ भर्ता’ भरण- ‘पोषण करणारा सर्वाचा स्वामी, ‘ साक्षी ‘ म्हणजे दृष्टा रूपात राहिलेला, सर्वाना जाणणारा, सर्वांचे निवासस्थान असणारा, शरण येण्यास योग्य, जगाचा सखा,

उत्पत्ती आणि प्रलय म्हणजेच शुभाशुभ संस्कारांचा विलय तसेच अविनाशी कारण मीच आहे. अर्थात शेवटी ज्याच्यामध्ये प्रवेश मिळतो त्या साऱ्या विभूती मीच आहे.

मूळ श्लोक

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ ९-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहम्‌ = मी, तपामि = सूर्यरूपाने ताप देतो, वर्षम्‌ = पर्जन्याचे, निगृह्णामि = आकर्षण करतो, च = आणि, उत्सृजामि = वर्षाव करतो, अर्जुन = हे अर्जुना, अहम्‌ एव = मीच, अमृतम्‌ = अमृत, च = आणि, मृत्युः = मृत्यू (आहे), च = तसेच, सत्‌ असत्‌ = सत्‌ आणि असत्‌, च = सुद्धा, अहम्‌ = मीच आहे ॥ ९-१९ ॥

अर्थ

मी सूर्याच्या रूपाने तापतो, मी पाणी शोषून घेतो व पाऊसही पाडतो. मृत्यूच्या पलीकडचे अमृतत्त्व तसेच मृत्यू, सत आणि असत्‌ सर्व काही मीच आहे. म्हणजेच जगाला प्रकाश देणारा सूर्य मीच आहे. माझी उपासना करणारे

कधी मला असत्‌ समजतात तेव्हा ते मृत्यू पावतात.

मूळ श्लोक

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥ ९-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ

त्रैविद्याः = तीन वेदांनी विहित केलेली सकाम कर्मे करणारे, सोमपाः = सोमरस पिणारे असे, पूतपापाः = पापरहित पुरुष, यज्ञैः = यज्ञांच्या द्वारा, माम्‌ = माझी, इष्ट्वा = पूजा करून, स्वर्गतिम्‌ = स्वर्गाच्या प्राप्तीची, प्रार्थयन्ते = इच्छा करतात, पुण्यम्‌ = आपल्या पुण्याचा फलरूप असा, सुरेन्द्रलोकम्‌ = स्वर्गलोक, आसाद्य = प्राप्त करून घेऊन, ते = ते पुरुष, दिवि = स्वर्गामध्ये, दिव्यान्‌ = दिव्य असे, देवभोगान्‌ = देवतांचे भोग, अश्नन्ति = भोगतात ॥ ९-२० ॥

अर्थ

उपासनेच्या तीन अंगाचे – क्रक, साम आणि यजु म्हणजे प्रार्थना, समत्वाची प्रक्रिया आणि यज्ञाचे आचरण करणारे, सोम म्हणजे चंद्राचा सूक्ष्म प्रकाश प्राप्त करणारे, पापातून मुक्त होऊन पवित्र झालेले पुरुष त्याच यज्ञाच्या निर्धारित प्रक्रियेतील – विधीने माझ्या इृष्टरुपाची पूजा करुन स्वर्गप्राप्तीसाठी प्रार्थना करतात. ही असतूची कामना आहे. यामुळे त्यांना मृत्यू प्राप्त होतो, त्यांचा पुनर्जन्म होतो. ते यशातील निर्धारित विधीने माझी पूजा करतात. परंतु

स्वर्गातील दिव्य पदार्थाच्या भोगाची याचना करतात. असे पुरुष आपल्या पुण्यफलामुळे इंद्रलोक प्राप्त करतात व तेथील स्वर्गीय देवतांसाठी असणारे दिव्य भोग भोगतात. अर्थात ते भोगदेखील मी देत असतो.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ९१.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment