सुरळीची वडी
साहित्य:
१ वाटी बेसन पीठ, ३/४ वाटी दही, २ १/२ वाटी पाणी, हिरवी मिरची पेस्ट १/२ चमचा, १/४ चमचा हळद, चवीनुसार मीठ,
फोडणीसाठी: २ चमचे तेल, मोहरी, हिंग, कडीपत्ता
सजावटीसाठी: कोथिंबीर आणि सुके खोबरं
कृती:
१. प्रथम एका बाउलमध्ये बेसन, दही, पाणी, हळद, मीठ घालून एका दिशेने फेटून घ्यावे. कुठेही गुठळ्या दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२. एकीकडे मोठ्या प्लेट्स किंवा थाळ्याला तेल लावून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
३. एका कढईमध्ये फेटलेलेेे मिश्रण मंद आचेवर साधारणपणे ७-८ मिनिटे शिजू द्यावे. शिजवताना सारखे हाटून घ्यावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
४. थोडे शिजल्यावर, साधारण सेमी- लिक्विड असतानाच हे ग्रीस केलेल्या प्लेटला उलथन्याच्या साहाय्याने पातळ थर मध्ये पसरवून घ्यावे. गार झाल्यावर याच्या उभ्या वड्या पाडाव्यात आणि गोल गोल गुंडाळून घ्यावेत.
५. वरतून फोडणी द्यावी आणि कोथिंबीर खोबरे टाकून सर्व्ह कराव्यात.
अश्याप्रकारे आपल्या सुरळीच्या वड्या तयार!