पुण्यामध्ये तालिबानी अटॅक –
मुजाहिद क्र.१- अय मोटी आवरत हिजाब कायकू नई पैनी ?
काकू – ई कोण है तुम, अस ओळख नसताना काय बोलताय ?
स्प्लेंडर वर लाल केसाचा टायगर वाघमारे – ( विमल थुंकून ) अय #₹#& बाया छेडतो का ? इथच थांब १० मिनिट एक बापाचं आशिन तर… हालो पप्या सामान आण दोन लांबड्या घेऊन ये मेटर झालाय.
मुजाहिद क्र.२ – बडेही बत्तमिज इंसान है आप ? हम इस आवरत से बात करे तुम बीच मैं क्यूँ फुदकरे ? इधर आव नीचे बैठो हात पीच्चे करके गोली खाव.
टायगर – आ बा बा बा, मला घोडा दाखवतो, मला घोडा दाखवतो..#₹@#ल्या तुला म्हायत्ये मी कोने ? आज तुझा विषयच
आप्पा (गाडीतून वाकून बघत ) – अय चिचुक्या काय झालं, बाजूला हो गाडी जाऊदे बाजूला व्हवून भांड तिद तलाठी जायचं घरी…
मुजाहिद क्र १ – अरे इस बुढ़ाव को बाहर निकालो… मार दो इसे… नई नई बम् लगाओ इसकु धुवा धूवा करदो… आय तुम भार आव
टायगर – बाजूनी घ्या ना गाडी काय रस्ता बापाचा ए का ? तिकड घाला तुमची
आप्पा – ( गाडीतून उतरून फाड फाड चार पाच टायगर च्या ठेऊन देतो ) व्हो घरी भाडखाव…अजून एक वाजवली तर मुडून पडशिन… आण तू अय नटरंग्या मला ब्वांब लावतो हिडक ये हातापशी
मुजाहिद क्र १ – (टायगर कडे बघत ) नई आयगा, वईसे बात करो
आप्पा – कुडल्ला ए तू ? आण हे झुरळ बी तुझ्यासंग ए का?
मुजाहिद क्र १ – तालिबान से आये हम ये पता नी कोण ए हम नई पैचांते
आप्पा – तालिबान कुड आल आण बंदुकी घिऊन कायला फिरायला आसली ए का ते ??
मुजाहिद क्र १ – हा असली ए, अभी ये सारा पूना हमारा है, तुम सब अब वही करोगो जो हम बोलेंगे..
आप्पा – काय कागद पतर किया क्या ऐसेही लीया ? गाव मैं जमीन है क्या तुमारी ??
मुजाहिद क्र १ – हा भोत हे, ४ कुये है पेतरोल के,
आप्पा – आज से नई है…आज से वो हमारे है..बैठ गाडीमे ५ मिनिट के आंदर नाय बैठा तो नागडा करके मारुंगा…तलाठी के पास जाके गपचुप सही आंगठे करणेका…वो कुवा मेरा है
क्रमशः
मनोज शिंगुस्ते
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक होते आता नहियेत)