बोलणारी कुत्री भाग १

बोलणारी कुत्री भाग १

बोलणारी कुत्री भाग १ –

स्थळ :- पुणे

टफी : (एका पायाने कान खाजवत) खूप प्रॉब्लेम्स आहेत यार काल दिवसभर फक्त बिस्कीटावर होतो..

एंजल : (गुलाबी टी शर्ट घालून ) ए व्हाय ? तुझी ओनर तर फुडी आहे ना ?

टफी :  (शिंकत ) हो रे… पेडिग्री आणि हेन बोन शिवाय खात नव्हतो मी, काल कोणीतरी सांगितलं कुत्र्याला पण कोविड होतो तेंव्हा पासून फक्त बिस्कीट टाकतात तेही लांबूनच…एक बिस्कीट तर लिटरली प्लेट बाहेर पडलं… वाज सो अंबेरेसिंग..

एंजल : – याक…किती सुपरस्टीशन्स आहेत तुमच्याकडे…अस कस आपल्याला कोविड होईल…मी बाई नाजुक मला नाही जमणार बिस्कीटावर दिवस काढणं…अँड तू खाल्लस ते बिस्कीट .??

बाब्या ( नेमका गटारातून बाहेर येत, अंग झटकत ) काय विषय सगळे जमा झाले ?

एंजल: शी…तू गटारात काय करतोय ???

बाब्या : ( दोन पाय पुढे करून आळस देत ) काय इषय झाला.. मी रात्री त्या निळ्या कार वर धार मारली आणि गप झोपलो, कुणीतरी वढून आणला आणि मला इथ टाकला, थंडी वाजायली म्हण उठून पाह्यलं तर गटारात…

टफी : (मान मागे घेत) यार तु लांब थांब ना प्लिज, किती घाणेरडा वास येतोय आणि तुला पकडुन नेलेला ना पालिकेने परत कसा आलास ?

बाब्या – ( मान हलवत ) त्यो तर लै डेंजर विषय… अमाला नेल सगळ्यांना मी, चौकतली चिंगी, डब्र्या, टायगर आणि एक नवीनच व्हत त्याच नाव नाय माहीत…तिथं नेल चिंगी च्या गळ्यात पट्टा व्हता तिला दुसरीकडं नेल आण आमाला जनावराच्या डवाक्टर कड

टफी : – डॉक्टर कडे कशाला ?

बाब्या – आर ते नसत का ?

टफी : आरे…ते…जाऊदे ही एंजल गेली की सांगतो तुला.. ब्वाइज टॉक ए

टफी : हा पण मग सुटला कसा तू ???

बाब्या – गेलो आणि डायरेक्ट डॉक्टर चा धरला …

टफी आणि एंजल अचंबित होऊन मागे सरकत

बाब्या – हात…आणि चावून पळत आलो

टफी :मोठा श्वास सोडत आता काय ठरवल काय करणार आहेस ??

बाब्या – ( उलटा होऊन लोळत लोळत ) काही नाही आता, आपल टेन्शन चे दिवस संपले…भारी लिंक घावली..मस्त पैकी एक ढाबा ए… शिपटी हलवायची …मटण मच्ची… माशे … आगा गा गा लै निवांत चाललै… काल तर प्रॉनस आणि सुरमई…

टफी :लाळ गाळत, प्रोसेस काय असते तिथं जायची…

बाब्या – काही नाही आज त्या निळ्या कार पशी झोप…

मनोज शिंगुस्ते

लेखक आज निवांत आहेत.

Leave a comment