द फॅमिली मॅन (सिजन २)

द फॅमिली मॅन (सिजन २)

द फॅमिली मॅन (सिजन २)

द फॅमिली मॅन (सिजन २) कोणी कोणी पाहिलाय ?? पाहण्यासारखा आहे.. नक्की पहा… खास करुन “राजी(समंता)… चेल्लम सर… अथर्व(श्रीकांतचा मुलगा)” यांना तर सलामच… आणि नेहमीप्रमाणेच… श्रीकांत… जे के… सुची… अरविंद(शरद केळकर)… ध्रिती… समीर… भास्करन…  सर्वांनी कमालच केलीये… पहावा असा… द फॅमिली मॅन (सिजन २) खास करुन समंता साठी… जीला आपण जवळपास सर्वच चित्रपटात रोमँटिक भुमिका साकारताना पाहिलय… तीच ती समंता.. या द फॅमिली मॅन (सिजन २) मधे मात्र एका श्रीलंकन तमिळ मुलीचा रोल करताना तुम्हाला वेगळ्याच भुमिकेत पहायला मिळतेय.

ज्यांनी द फॅमिली मॅन (सिजन २) वेब सिरीज पाहिली आहे त्यांनी कमेंट करुन सांगा… तुम्हाला कसा वाटला दुसरा सिजन.. कळवा जरुर…आता नाण्याची दुसरी बाजु… या वेबसिरीजला तामिळनाडू मधे तुफान विरोध होत आहे… सोशल मिडीयावरसुद्धा तमिळ लोकं या वेबसिरीजवर बंदी घाला अशी मागणी करत आहेत. त्यांची मागणी काही चुक म्हणता येणार नाही…याचं कारण सुद्धा तेवढंच महत्वाचे आहे.

कारण या वेबसिरीजमधे ज्या घटना दाखवल्या जात आहेत त्यामधुन ही वेबसिरीज तमिळ विरोधी असल्याचा दावा केला जात आहे. यामधे भारत सरकार एलटीटीई(लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम) विरुद्ध यासाठी कारवाई करत आहे की ज्यामुळे श्रीलंकन सरकार खुष होउन भारताशी पोर्ट डील करेल.

पण यात भारत सरकार आपल्याच देशाचे एक राज्य असणाऱ्या तामिळनाडू मधीलच पण श्रीलंकेमधे राहत असलेल्या श्रीलंकन तमिळ लोकांपेक्षा श्रीलंका सरकारची बाजु घेत आहे असे दिसत राहते.

प्रत्यक्षात या वेबसिरीजमधे एलटीटीई कडुन घडवण्यात येणार असलेली घटना जरी खरी नसली तरी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या मात्र अशाच गोष्टीमुळे म्हणजे भारत सरकार तमिळ लोकांची बाजु घ्यायची सोडुन श्रीलंका सरकारची बाजु घेउन त्यांच्याबरोबर सामिल होउन आमच्यावर अन्याय करतेय(यात कितपत तथ्य आहे हा अभ्यासाचा विषय आहे) अशा भावनेतून झाली होती हे आपल्याला माहिती असेलच.

एलटीटीई ही जरी दहशतवादी संघटना असली तरी ती आपल्या भारतातील कोणत्याही भुमीचा वापर करत नाही अन भारत सरकार तसा वापर सुद्धा करु देत नाही.

ती संघटना श्रीलंकेत अन्याय होणाऱ्या तमिळ लोकांसाठी न्याय देण्यासाठी आणि सर्व तमिळ लोकांचे एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.

हा आता तीचा मार्ग चुकीचा आहे हे कोणीही मान्य करेल पण भारत सरकारने त्यांच्या अंतर्गत विषयात पडु नये अशी त्यांची मागणी होती अन आहे. या वेबसिरीजमधे दाखवण्यात आलेल्या दृष्यांमधुन श्रीलंकन तमिळ लोकं दहशतवादीच आहेत असा समज त्रयस्थ माणसाचा तयार होत असल्याचा दावा तमिळ लोकांकडुन होत आहे. आणि म्हणून या वेबसिरीजवर बंदीची मागणी जोर धरत आहे.

तमिळ लोकांना तमिळ अस्मिता सर्वात जास्त प्रिय आहे. जसं आपल्याला मराठी माणसाबद्दल भले तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल, कसाही असेल तरी आपल्याला मराठी लोकांबद्दल इतर लोकांपेक्षा जास्त आपुलकी वाटते तसंच तमिळ लोकांचं आहे. मग भले ते लोकं श्रीलंकेतील तमिळ का असेना पण ते शेवटी तमिळच आहेत. ते तमिळनाडू मधुनच श्रीलंकेमधे गेले आहेत. मग त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारच…

श्रीलंकन सरकार या श्रीलंकन तमिळ लोकांना नागरिक असल्याचा दर्जा देत नाही, सर्व बाबतीत अन्याय करण्यात येतो याविरुद्ध आवाज एलटीटीई उठवते असा दावा बहुतांश तमिळ लोकांचा आहे.

एलटीटीई त्यांच्यासाठी स्वातंत्र्ययुद्ध करतेय असा समज सर्वत्र असल्याने बहुतांश तमिळ लोकं एलटीटीई विरोधात केलेल्या कोणत्याही कारवाईला विरोध करत राहतात. आणि म्हणूनच एलटीटीई विरुद्ध केलेली कोणतीही कृती म्हणजे तमिळ अस्मितेविरुद्ध, तमिळ लोकांविरुद्ध केलेली कृती असा समज तयार होतो. आता तुम्ही यावर अधिक माहिती घ्या अन वेबसिरीज बघुन ठरवा तुम्हाला काय वाटतं.. अन्य माहिती मिळवण्यासाठी गुगल आहेच मदतीला..

(यासोबतच मद्रास कॅफे हा चित्रपट पहा जो माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या एलटीटीई कडुन कशी घडवुन आणण्यात आली यावर आहे )

– कऱ्हाळे चांदोजी

Leave a comment