खेळाची मजा | The game of life

bhampak-banner

खेळाची मजा –

ज्या खेळाचा निकाल अनिश्चित आहे, तो खेळ खेळण्यात आणि पाहण्यात मजा असते. मॅच फिक्सिंग झालेल्या खेळात खेळणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला दोघांनाही मजा येत नाही. आपल्या जीवनाचा खेळ असाच अनिश्चित आहे म्हणूनच तो खेळ खेळण्यात एक वेगळी मजा आहे. खेळण्यासाठी खिलाडूवृत्ती असावी लागते. दुर्दैवाने आपण आपल्या जीवनाचे काही खेळ असे खेळतो, की _त्यात आपल्याला मॅचफिक्सिंग हवी असते. कदाचित आपल्या प्रत्येक खेळात ती आपल्याला हवी असते, म्हणून अशा मॅच फिक्स झालेल्या खेळात म्हणजे जगण्यात आपल्याला उल्हास वाटत नाही.खेळाची मजा.

चैतन्य हरवल्यासारखी माणसे उदास होऊन जीवनाचा खेळ खेळत असतात. आपला खेळ साक्षीभावाने आपला आत्मा, म्हणजेच परमात्म्याचा प्रतिनिधी पहात असतो. जिंकण्यासाठी खेळणारी माणसे, खेळाची मजा खरोखर लुटत असतात, जिंकलो तर यश आणि हरलो तर अनुभव, हे त्यांचे सूत्र असते. अशा लोकांचा खेळ कधीच निष्फळ नसतो.

आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संपूर्ण अनिश्चितता आहे, त्यामुळे खेळाची खरी मजा आज घेतली पाहिजे !

निंदी कोणी मारी l वंदी कोणी पूजा करी ll
मज हे ही नाही तेही नाही l वेगळा दोन्ही पासुनी ll
देह भोग भोगे घडे l जे जे जोडे ते ते बरे ll
अवघे पावे नारायणी l जनार्दनी तुकयाचे ll

ही खरी खिलाडूवृत्ती आहे.

डॉ. आसबे ल. म.

Leave a comment