दुसऱ्याला दुःख देणे, हे सुख देण्यापेक्षा अवघड असते!

By Bhampak Articles Laxman Asbe 2 Min Read

दुसऱ्याला दुःख देणे, हे सुख देण्यापेक्षा अवघड असते!

दुसऱ्याला दुःख देणे किंवा त्रास देणे, हे सुख देण्यापेक्षा अवघड असते. आपण स्वतः आत्मपरिक्षण केल्यावरचयाची सत्यता पटते, थोडक्यातआपण चांगले होण्यापेक्षावाईट होणे अवघड आहे. याचे कारण आपले मूळ स्वरूप हे चांगलेच आहे, ते जसे आहे तसे ठेवणे सोपे असते, त्यात बदल करणे कष्टाचे आणि अवघडही आहे. तरीही आपण दुसऱ्याला दुःख किंवा त्रास द्यायला प्रवृत्त होतो याचे कारण आहे त्रिगुण आणि षड्विकार. एकदा आपल्या देहाने याचा अंगीकार केला की आपले मूळ स्वरूप जे चांगलेच आहे ते झाकले जाते आणि विकृत वृत्ती धारण केली जाते. ही विकृतीच आपल्याला मानवाचा दानव बनायला भाग पाडते .

एकदा दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला आनंद मिळू लागला की आपण वाईटाची परमसीमा गाठलेली आहे, हे निश्चित समजावे. आपण दुसऱ्याला त्रास देण्याच्यातळाशी मत्सर असतो, हा तुलनेतून तयार होतो आणितुलना स्वतःची ओळख विसरल्यानेतयार होत असते . आपली मूळ स्थितीअंतर्मूख झाल्याशिवाय समजत नाहीआणि माणूस साधनेशिवायअंतर्मूख होत नाही. आपल्या वाईट होण्याचे मुख्य कारण आहे आपली बहिर्मुखता, यात बदल करणे अवघड जाते कारणबहुतांशी जग हे बहिर्मुख आहे .

नाथ महाराज म्हणतात जो बहिर्मुखतेतून अंतर्मूख होण्याचा प्रयत्न करतो, त्यास जग म्हणते, आजि म्या नवल पाहिले ।वळचणीचे पाणी आढ्या लागले ।। हा प्रवास जगाच्या दृष्टीनेउलटा आहे आणिउलटे फिरल्याशिवायआपले मूळ स्वरूप समजत नाही, चार वेद त्या स्वरूपाचे वर्णन करतात , १) ऋग्वेद — प्रज्ञानं ब्रम्ह ।२) यजुर्वेद — अहं ब्रम्हास्मि ।३) सामवेद — तत्त्वमसि ।४) अथर्ववेद — अयमात्मा ब्रम्ह ।या उपदेशाला पाठ फिरविली कीआपण विकृत होऊ लागतो.

आज चांगुलपणाचाहीबाजार भरलेला आहे , या वाईटाच्या वावटळीत आपल्याला चांगुलपणाचा दिवा तेवत ठेवायचा आहे. अर्थे लोपली पुराणे ।नाश केला शब्दज्ञाने ।विषय लोभीं मनें ।साधन हे बुडविले ।।याचा हा दुष्परिणाम आहे, _यातून बाहेर निघायचे असेल तर_, झाडू संतांचे मारग ।अडरानी भरले जग ।उच्छिष्टाचा भाग ।शेष उरला ते सेवू ।।या मार्गावर यावे लागेल. एकदा या मार्गावर पाऊल पडले की मग पटेल, खरचचांगले राहणे सोपे आहे , वाईट होणे अवघड आहे , दुसऱ्याला सुख देणे सोपे आहे , दुसऱ्याला दुःख देणे अवघड आहे.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार 

Leave a comment