ती, मी आणि पाऊस भाग ३

By Digvijay Vibhute Articles Entertainment 7 Min Read
bhampak post

ती, मी आणि पाऊस..!!! – भाग तीन

आता आम्हाला दोघांना पण कळले होते की आम्ही एकमेकांना आवडतो. त्यामुळे आमच्यात कमालीचा मनमोकळेपणा आला होता. काहिही असो आम्ही बिनधास्त एकमेकांना सांगायचो. तासनतास गप्पा मारत बसायचो. “ती” माझा जिवलग मित्र आणि मी “ती”ची जिवलग मैत्रीण असं नातं झालं होतं आमचं. आणि मैत्रीच्या पलिकडे जायची ओढ लागलेली होती. प्रेम वगैरे एवढं काय कळत नव्हतं. म्हणजे मला तरी जास्त कळत नव्हतं. टिव्हीवर मुव्हीज मधे जेवढं पाहिलेलं तेवढंच कळायचं. बाकि प्रेम म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? याचा दुरदुर पर्यंत गंध नव्हता मला. असचं एक मुव्ही पाहिली आणि तीला प्रपोज करायचं ठरवलं..
त्या दिवशी आम्ही तीच्या घरात अभ्यास करत बसलो होतो. घरात दुसरं कोणीच नव्हतं. बराचवेळ अभ्यास करून मी पेंगायला लागलो होतो. मला पेंगताना पाहून “ती” उठली आणि किचन मधे गेली. थोड्या वेळाने बाहेर आली, हातात चहाचा कप होता…
ती : हममम हा घे चहा.. झोप जाईल…
(मी पुस्तक बंद करत बोललो)
मी : कंटाळा येतो मला अभ्यास करायचा… झोप येते…
ती : म्हणून तर चहा केला ना..
(मी चहा पिला, ती माझ्याकडेच पहात होती, गालातल्या गालात हसत होती… मी एक मोठा श्वास घेऊन म्हणालो)
मी : एक बोलू?
ती : बोल ना..
मी : आयुष्यभर असचं माझ्यासाठी चहा बनवून देशील?
ती : (मस्करीत) मी चहावाली बनू का?
मी : मस्करी नाहि, खरचं विचारतोय.. मला तू आवडतेस… आपण गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड होऊया ना.
ती : त्याने काय होईल?
मी : आपण मोठे झाले की लग्न करू.
ती : अजून खूप वेळ आहे त्याला.
मी : हो.. पण आता गर्लफ्रेंड झालीस म्हणून काय होतं?
ती : आपण शाळेत “पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल ” यावर शिकलोय की. आपल्यात जे आहे ते प्रेम आहे की आकर्षण हे अजून कळलं नाहि मला. अजून आपण लहान आहोत, दोन वर्ष थांबुया आणि आपलं नातं असचं राहिलं तर मग गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड होऊया. थांबशील?
मी : नक्की…
ती : थॅन्क्स डिअर…
“ती”ने मला घट्ट मिठी मारली आणि दुसर्‍याच क्षणाला बाजूला झाली. तोंडासमोर पुस्तक पकडलं आणि अभ्यास सुरू केला… मी नुसता बघत राहिलो.. डोळ्याची पापणी न लवता…
दिवसामागून दिवस जात होते.. आमच्यातलं नातं दिवसागणिक दृढ होत चाललं होतं. स्वभाव मात्र जरा बदलला होता. म्हणतात ना ढवळ्या शेजारी बांधला पवळा अन् वाण नाय पण गुण लागला. अगदि तसचं झालं होतं… मी जरा शांत झालो होतो (कदाचित “ती”च्या सहवासात राहून) आणि ती जरा मस्तीखोर झाली होती (कदाचित माझ्या सहवासात राहून).. आता बर्‍यापैकी कळायला लागलं होतं. एकमेकांबद्दल मनात आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढत होता. एकमेकांना समजून घेणे, समजून सांगणे हे प्रकार आपोआप होऊ लागले. माझ्या स्वभावात झालेला हा बदल बहुतेक “ती”ला फारच आवडला होता. असचं काही बोलताना मधेच ती मिठी मारायची.. मला सुचायचं बंद व्हायचं.. मी “ती”च्या पाठीवर हात ठेवणार तेवढ्यात ती दूर झालेली असायची… मी गालातल्या गालात हसायचो आणि मिठी मारायला उचललेले हात पुन्हा खाली घ्यायचो.
आमची दहावीची परिक्षा झाली आणि “ती” मामाच्या गावाला सुट्टीला गेली. “दोन महिने सुट्टीची मजा घेऊन येणार” असं म्हणाली जाताना. मला अजिबात करमत नव्हतं “ती” नसताना.. दोन महिने कसे जाणार या विचाराने तर अजून त्रास व्हायचा..
त्या दिवशी सकाळी मी झोपेत होतो, माझ्या तोंडावर कोणीतरी पाणी मारले.. खडबडून जागा झालो.. समोर बघतो तर “ती”.. हातात पाण्याची बाटली घेऊन…
मी : तु????
ती : भुत पाहिल्यासारखं काय तोंड केलयं?
मी : तु दोन महिन्यांनी येणार होतीस ना? आठ दिवसात कशी काय आलीस?
ती : जाऊ का परत?
मी : नको…
(ती हसत हसत बाहेर निघून गेली.. कदाचित “ती”ला पण करमत नसणार म्हणून लगेच माघारी आली..)
दुपारी घरात कोणीच नव्हतं. आई बाबा कामाला गेलेले, आजी आजोबा मंदिरात भजनाला,  आणि ताई क्लास ला गेलेली.. तीचे आई बाबा पण कामाला गेलेले.. आम्ही दोघेच होतो घरात.. निवांत टिव्ही पहात गप्पा मारत बसलो होतो.. जोरात वारा सुटला होता.. वादळी वारा.. अंधारून यायला सुरवात झाली होती.. तेवढ्यात लाईट गेली आणि टिव्ही बंद झाला..
ती : चल आपण टेरेस वर जाऊ.. आता जोरात पाऊस पडणार बहुतेक..
मी : भिजायचयं तुला?
ती : हममम चल.. मजा येईल..
आम्ही दोघे टेरेस वर गेलो. आकाश काळ्या ढगांनी गच्च भरलं होतं, जोरात वारा सुटला होता, “ती”चे केस वाऱ्यावर उडत होते, केस नीट करायची तीची धडपड चालु होती, मी “ती”ला केस सावरायला मदत करू लागलो, ती एकटक माझ्याकडे पाहू लागली.. पावसाचे मोठे मोठे थेंब पडायला सुरवात झाली..आम्ही तसेच एकमेकांकडे पहात स्तब्ध उभे होतो… पाऊस जोरात पडू लागला.. वळवाच्या पावसात आम्ही भिजत उभे होतो.. एकटक एकमेकांकडे पहात.. भिजल्यावर तीचं सौंदर्य अजून खुललं होतं.. खूप सुंदर दिसत होती ती.. तीच्या चेहर्‍यावरची केसांची बट कानामागे सरकवत मी म्हणालो
मी : खूप सुंदर दिसतेय तु…
एवढ्यात जोरात वीज कडाडली आणि “ती” अलगद मला बिलगली.. आता मी मिठी घट्ट करायला हात उचलले.. क्षणभर थांबलो.. “ती” तशीच मिठीत होती.. मग मी पण मिठी घट्ट केली… पावसाचा जोर वाढला होता.. मी तीच्या गालावर हात ठेवले आणि तीच्या कडे पहात म्हणालो
मी : I Love you
ती : माहितीये मला..
मी : तु?
ती : माहितीये तुला..
मी : तुझ्या तोंडून ऐकायचयं..
ती : नाहि सांगितलं तर?
(माझ्या आणि तीच्या ओठांमधे खुपच कमी अंतर राहिलं होतं.. प्रत्येक वाक्यानंतर ते अंतर अजून कमी व्हायचं.)
मी : सांगशील तु.. आज.. आत्ता..
(एवढ्यात जोरात वीज कडाडली आणि ढगांचा गडगडाट झाला.. ओठांमधलं अंतर संपलं.. ओठांना ओठ भिडले.. डोळे आपोआप मिटले गेले.. मिठी अजून घट्ट झाली.. थोडावेळ सगळ्या जगाचा विसर पडला.. एका वेगळ्याच विश्वात आम्ही रमलो होतो.. काहि वेळाने आम्ही भानावर आलो.. डोळे उघडले.. भिडलेले ओठ एकमेकांपासून दूर झाले…)
ती : I love you too
(तीने पुन्हा मला मिठी मारली.. आणि बराचवेळ असचं भिजत आम्ही उभे राहिलो.. दोघांच्याही चेहर्‍यावर वेगळेच भाव होते कदाचित समाधानाचे आणि प्रेमाचे..)
क्रमशः
Leave a comment