तो आणि ती

By Bhampak Story 4 Min Read
तो आणि ती

तो आणि ती –

“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं”.

तो आणि ती  दोघी फार वेडे आहेत.. या जगात राहून पण फार वेगळं जग त्यांचे ज्यात फक्त आणि फक्त खूप वेडेपणा.. प्रेम… प्रेम…आणि प्रेम आहे… एकमेकांची तीव्र ओढ.. काळजी.. पण “ती” आज खूप उदास आणि रागात होती.. राग म्हणणे पण तसे चुकीचे ठरेल तर “ती” खूप त्यांच्या प्रेमाच्या काळजीत होती… त्यामुळे “ती” “तो” वर फार चिडलेली आणि नाराजही होती.. तरी शांत नदी सारखी.. “ती”ची त्याच्या हट्टामुळे घरात कशी कुचंबणा होते ते त्याला समजावत होती.”तो” “ती”ची तळमळ तिच्या उदास चेहऱ्यावर पाहत होता..  त्याला रात्रीच याबद्दल जाणीव झाली होती… का सारखे सारखे VC कर तो सांगतो… आणि तीही मग घरात सगळे असतांना रिस्क घेते.. VC करते फक्त त्याचा शब्द “ती” ला मोडायचा नसतो.. ते बराच वेळ मग बोलत राहिले याच विषयावर…

एकमेकांची अंतरमनापासून काळजी असल्यामुळे त्याच्या इगोचा लवलेश नाही… चिडतात पण प्रेमात आणि प्रेमासाठी.. तिची फार धडपड असते का कुठलेही संकट नको त्या ठोंब्याचा जिद्दीमुळे…. तोही तिची सगळी कळकळ समजला आणि तिचा “खारा शेंगदाणा” “चिक्की” झाला. ती पण बोलली मग “शहाणे बाळ” माझे… आणि हो आता पुढे…. त्याने तिला रात्रीच सांगून ठेवले होते.. “पिल्लू” लाल साडी बरं उद्या… “मंजुळा”पण मग आहो धनी लाल नेसली हाय बरं.. धनी खुश…. ☺️ मग इचारु नका म्याच सांगतो… मंजुळे डोक्यावर पदर घे ग…. मंजुळा पदरात आणि तेही पदर दातात घेऊन एकदम किलर अंदाज मध्ये…ठोंब्या जागेवर गार झाला की “राव”… त्याची छाती तर सातपुडयाचा राजा सारखी फुलली होती… इतकी गोड अगदी सातपुडयाची महाराणी दिसत व्हती “मंजुळा” बर झालं ठोंब्या समोर नव्हता… नाय तर तुम्ही ईचारु नका आणि म्या पण सांगणार नाय.

त्यानंतर मग अधून-मधून chat वर बोलत राहिले आणि बऱ्याच गोष्टी होत राहिला… “ती” फारचं कोमल आहे आणि तिला त्याची अगदी त्याच्या आईला जशी काळजी असेल तशीचं तिला आहे… या गोष्टीची जाणीव त्याला आज त्याला झाली… जे म्हणतात ना का प्रेमात स्वतःला अर्पण करावे या गोष्टी तो ऐकत आला होता… पण तिच्या रूपाने त्याला अनुभती झाली.. त्याने तिचे काही निर्णय होते ते तिच्या पश्चयात घेतले… तिने त्याला साधा एक प्रश्न सुद्धा केला नाही.. त्याचे मन फार भरून आले.. आणि “तो”ही बिनधास्त होता निर्णय घेतांना “ती” प्रश्न करणार नाही याची त्याला जाणीव होती. पण “ती” त्याच्या निर्णयात त्याला विचारते त्याने हजार वेळा सांगितले का “मैना” नको ग ईचारु मला “राग” येतो तू मालकीण हाय ग ठोंब्याची तो किती पण वाघ असला तरी तुझ्या समीर शेळी हाय… ध्यानात घे बर मंजुळा आता पूढे… मंजुळाने त्याला VC केला तवा समदे घरात होते… मंजुळा पण शेवटी ठोंबी हाय तो आनंदी होतो ते तिला बघायचे व्हते त्याचा आनंद बघून तिला पण लै म्हणजे लै आनंद होतो.

त्यांचे प्रेम म्हणजे अगदी “उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं” असे हाय बाकी ते… लब्यू.. लब्यू.. दिवसभर सुरूच असतं ते जर जवळ असते तर सातपुडयाच्या राजकुमारचे बारसे झाले असते.

वादा रहा सनम होंगे जुदा ना हम चाहे ना चाहे जमाना.

क्रमशः

© कऱ्हाळे चांदोजी  & …

Leave a comment