व्हेज चीज चिली टोस्ट
साहित्य:
४ ब्रेड स्लाइस, बारीक चिरलेली भोपळी मिरची, कांदा, मीठ, मिरपूड, अमूल बटर, चीज
कृती:
१. प्रथम ब्रेड स्लाइस ला अमूल बटर लावून घ्यावे.
२. त्यावर चिरलेली भोपळी मिरची, कांदा घालावा. त्यावर थोडी मिरपूड भुरभुरवा. चवी पुरते मीठ घाला.
३. हे ब्रेड ओव्हनमध्ये थोडे चीज वितळेपर्यंत बेक करून घ्या किंवा तव्यावर झाकण ठेवून भाजून घ्या.
४. आवडीप्रमाणे त्यावर चिली फ्लेक्स टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.
अशाप्रकारे व्हेज चीज चिली टोस्ट तयार!
टीप: तुम्ही यात उकडलेले स्वीटकॉर्न सुद्धा घालू शकता.