व्हेज सब पाव स्टफ
साहित्य:
४ पाव, अमूल बटर, टोमॅटो, कोबी, उकडलेला बटाटा, कांदा, लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ
कृती:
१. प्रथम पाव अमूल बटरवर मध्ये कापून दोन्ही बाजूने बटर लावून भाजून घ्या.
२. एकीकडे कोबी, टोमॅटो, कांदा उभा कापून घ्यावेत. एक बाउल मध्ये घेऊन त्यात लाल तिखट, चाट मसाला, मीठ घालून चांगले एकत्र करून घ्यावे. त्यातच उकडलेला बटाटा कुस्करून घ्या.
३. भाजलेल्या पावामध्ये तयार केलेले भाज्यांचे मिश्रण स्टफ करून घ्या आणि सर्व्हिग प्लेटमध्ये सर्व्ह करा.
अशाप्रकारे आपले व्हेज पाव स्टफ तयार!
Fantastic recipe will try it for sure.